1 / 10कितीही छान कपडे घालून तयार झालं तरी, केस विंचरलेले हवेत. कारण विस्कटलेल्या केसांमुळे माणूस झोपेतून उठून आल्यासारखा दिसतो.2 / 10 बरेचदा केस कितीही छान विंचरले तरी थोड्याच वेळात विस्कटून जातात. खरखरीत होतात. 3 / 10केस तुटक- तुटक दिसायला लागतात. आणि लहान केस उभे राहतात.4 / 10पोटॅशियमच्या कमतरतेमुळे असे होते. पातळ केसांना वारा लागला की ते लगेच विस्कटतात. 5 / 10जर तुमचेही केस असेच विस्कटलेले दिसत असतील तर, या काही घरगुती हेअरपॅक्सचा वापर करून बघा. नक्की फरक जाणवेल.6 / 10१. केसांना सरळ करण्यासाठी केळ्याचा वापर करा. केळ्याची पेस्ट करून घ्या. ती केसांना लावा. तासभर ठेवा. मग धुवून टाका. केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. 7 / 10२. कोरफड केसांसाठी सर्वच प्रकारे चांगली असते. केसांच्या वाढीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे केस सरळ राहण्यासाठीही मदत होते.8 / 10३. मेथीच्या पाण्याने केस धुतल्यानेही वाकडे तिकडे झालेले केस छान होतात. केसांसाठी उपयुक्त अशी पोषकसत्वही मिळतात. 9 / 10४. दही व मध यांच्या मिश्रणातून मस्त हेअर मास्क तयार करता येतो. त्यामुळेही केस विस्कटलेले दिसत नाहीत. 10 / 10५. केस तांदळाच्या पाण्याने धुवायचे. त्याचे अनेक फायदे आहेत. केस छान राहतात. तसेच केसांची ठेवणही छान दिसते.