भाज्या फक्त खाऊच नका, चेहऱ्यालाही लावा! भाज्यांचे 10 फेसपॅक, विसरा महागड्या ब्यूटी ट्रीटमेंट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 2:56 PM 1 / 10बीट रसाचा लेप: बिटाचा रस त्वचा स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरतो. बिटाचा फेसमास्क करण्यासाठी बीट किसून त्याचा रस काढावा. त्यात ऑलिव्ह तेलाचे 3-4 थेंब घालावेत. हे चांगलं एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यास मसाज करत लावावं. लेप चेहऱ्यावर पूर्ण कोरडा होवू द्यावा. आठवड्यातून एकदा बिटाच्या रसाचा लेप लावल्यास त्याचा फरक लगेच दिसतो.2 / 10गाजराच्या रसाचा लेप:- गाजर किसून पिळून त्याचा रस काढावा. त्यात मध घालावं. ते चांगलं एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. लेप चेहऱ्यावर 15मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा थंडं पाण्यानं धुवावा. आठवड्यातून 2 वेळा गाजराचा लेप लावल्यास त्वचा चमकदार होते.3 / 10पत्ताकोबीचा फेसपॅक:- पत्ताकोबीची भाजी आवडत असो नाहीतर नसो, पण तिच्या आहारात असण्याला जसं महत्त्वं आहे, त्याप्रमाणेच पत्ताकोबी सौंदर्योपचारातही अवश्य असावी असं सौंदर्याची नैसर्गिकपध्दतीने काळजी घेण्यासाठी उपाय सांगणारे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. पत्ताकोबीची ताजी हिरवी पानं मिक्सरमधून बारीक वाटावी. त्यात थोडं ग्रीन टी उकळून त्याचं पाणी घालावं. हा लेप चेहऱ्यावर लावावा आणि 15 मिनिटं ठेवावा. त्वचा तेलकट असल्यास चेहरा कोमट पाण्यानं धुवावा. पत्ताकोबीच्या लेपानं चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते. त्वचेस ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात.4 / 10बटाट्याचा लेप: बटाट्याच्या लेपामुळे चेहऱ्यावरचा उन्हानं आलेला काळपटपणा लगेच निघून जातो. बटाट्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी करुन बटाटा मिक्सरमधून बारीक करुन घ्यावा. बटाट्याच्या पेस्टमध्ये थोडं ग्लिसरिन घालावं. ते चांगलं एकत्र करुन ही पेस्ट चेहऱ्यास लावावी. अर्ध्या तासानं चेहरा धुवावा. या लेपामुळे चेहरा स्वच्छ होतो.5 / 10पालक- मधाचा लेप:- पालक धुवून् मिक्सरमधून वाटून घ्यावा. एका वाटीत 1 चमचा पालक पेस्ट आणि 1 चमचा मध एकत्र करावं. हे चांगलं मिसळून त्यात अर्धा चमचा ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा. मिश्रण पुन्हा नीट मिसळून घेतल्यानंतर ते चेहेऱ्यास लावावं. 15-20 मिनिटं ते चेहेऱ्यावर ठेवून् नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपल्यानंतर चेहेऱ्यास माॅश्चरायझर लावावं. पालकाच्या लेपामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते, उजळते. त्वचा मऊ मुलायम आणि तरुण होते.6 / 10डांगराचा लेप:- डांगरात ब्लीचिंग गुणधर्म असतात. डांगर हे नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करते. डांगराचा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे ताजं किसलेलं डांगर घ्यावं. त्यात 1 चम्चा लिंबाचा रस आणि 2 ई व्हिटॅमिन कॅप्सुल घालाव्यात. हे मिश्रण एकजीव करुन लेप तयार करावा. हा लेप चेहेऱ्यास लावून 15-20 मिनिटं ठेवावा. मग हात कोमट पाण्यात बुडवून ओले करावेत. ओल्या हातांनी 5 मिनिटं चेहेऱ्याचा मसाज करावा. त्वचा तेलकट असल्यास चेहरा कोमट पाण्यानं धुवावा. आठवडयातून 2 वेळा हा लेप लावावा.7 / 10कांद्याचा फेस पॅक: कांद्यात अ, क आणि ई जीवनसत्वं असत्ं. खराब झालेली त्वचा, स्किन एजिंग या समस्या कांद्याच्या लेपानं दूर होतात. कांद्याचा लेप तयार करण्यासाठी वाटीत अर्धा चमचा बेसन, थोडी चंदन पावडर, दही आणि लिंबाचा रस घ्यावा. हे एकत्र करुन त्यात मिस्करमधून बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावं. हा लेप चेहेऱ्यास लावून 10 मिनिटं ठेवावा. नंतर चेहेरा थंडं पांण्यानं स्वच्छ धुवावा. कांद्याच्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते.8 / 10काकडीचा फेस पॅक:- काकडीचा फेस पॅक करण्यासाठी एका वाटीत 1 चमचा चंदनाची पावडर, 1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा गुलाबपाणी, खोबऱ्याच्या तेलाचे 2-3थेंब घालावेत. काकडी किसून किंवा मिक्सरमधून बारीक करुन घ्यावी. सर्व घटक एकत्र करुन लेप तयार करावा. हा लेप चेहेऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावा. आठवड्यातून 2 वेळा हा लेप चेहेऱ्यास लावावा.9 / 10कारल्याचा लेप:- उन्हानं काळवंडलेली त्वचा, खाज या त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून कारल्याचा लेप लावल्यास फायदा होतो. यासाठी ताजं हिरवंगार कारलं घ्यावं. कारल्यातील बिया काढून घेऊन कारलं मिक्सरमधून बारीक करावं. 2 चमचे कारल्याच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा मध, 2 चमचे गुलाबपाणी घालून लेप तयार करावा. आधी चेहरा स्वच्छ धुवून पुसून मग कारल्याचा लेप चेहेऱ्यास लावावा. 20-15 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवून चेहेऱ्यास माॅश्चरायझर लावावं.10 / 10लिंबाचा फेसपॅक लिंबाच्या रसाचा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि 1 चमचा चंदन पावडर घालावी. सर्व घटक एकत्र करुन लेप चेहेऱ्याला लावावा. तो 20 मिनिटं ठेवल्यावर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. लिंबातील सायट्रिक ॲसिड आणि क जीवनसत्वामुळे त्वचा सतेज, प्रसन्न आणि तरुण दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications