गौरी-गणपतीच्या सणाला नेसा पारंपरिक साड्या, लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स -दिसाल कमाल सुंदर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 10:30 AM 1 / 7गौरी-गणपती म्हणजे पारंपरिक साडी, दागिने आणि नटणे-थटणे ओघानेच आले. अशावेळी टिपिकल लूक न करता आहे त्यातच थोडे वेगळे काही केले तर आपण सगळ्यांमध्ये छान उठून दिसू शकतो. पाहूया यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या (Traditional Stylish Modern look in Saree fashion Tips Ganpati Festival)...2 / 7आपल्याकडे आहे त्याच काठापदराच्या साडीवर आपण थोडे हटके फॅशनचे ब्लाऊज शिवले तर आपण नेहमीच्या साडीतही फॅशनेबल दिसू शकतो. यासाठी आपल्य़ाला ब्लाऊज शिवताना थोडी वेगळी फॅशन ट्राय करावी लागेल. 3 / 7नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी ट्राय करायला आणि स्टायलिश दिसायला आवडत असेल तर साडीवर एखादा वेस्टर्न बॅंड तुम्ही नक्की ट्राय करु शकता. सध्या बाजारात आणि ऑनलाइनही अशाप्रकारचे बँड सहज उपलब्ध असतात. आपण ब्लाऊज शिवतो तेव्हाच साडीला मॅच होणारा एखादा बँड आपल्या मापानुसार टेलरकडून शिवून घेता येईल.4 / 7सणवार म्हटले की आपण साधारणपणे सोन्याचे किंवा चांदीचे, मोत्यांचे असे पारंपरिक दागिने घालतो. पण थोडे वेगळे आणि मॉडर्न लूक देणारे दागिने ट्राय करायला आवडत असतील तर बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध असतात. आपण नेसणार असलेल्या साडीवर सूट होतील असे हे दागिने अगदी कमी किमतीतही सहज मिळू शकतात.5 / 7पारंपरिक मोती किंवा खड्यांमध्येही थोडे वेगळे डिझाइन्स ट्राय केले तर आपला लूक सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळा आणि उठून दिसेल. 6 / 7नेहमी केसांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतोच. कधी बन बांधणे तर कधी केस मोकळे ठेवणे असे साधे पर्याय आपण निवडतो. मात्र केसांच्या आहे त्याच लेंथमध्ये थोडे वेगळे काही केले तर आपले गेटअप आणखीन खुलून येतो. याला एखादा साधासा ब्रूच लावला तरी तो खूप सुंदर दिसतो. 7 / 7मेकअप करतानाही डोळ्यांचा, ओठांचा मेकअप थोडा डार्क केला तरी छान दिसतो. यामध्ये आपल्या साडीच्या शेडला मॅच होणारी शेड वापरल्यास आपण उठावदार दिसतो हे नक्की. आणखी वाचा Subscribe to Notifications