Dryness of skin due to winter season? Special oil massage for reducing dryness and wrinkles on skin
थंडीमुळे त्वचा कोरडी पडली- सुरकुतलेली वाटतेय? या खास तेलाने करा मालिश, त्वचा दिसेल तुकतुकीतPublished:January 16, 2023 06:21 PM2023-01-16T18:21:42+5:302023-01-16T18:27:49+5:30Join usJoin usNext १. थंडीचा कडाका जसा वाढला तसा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून यायला सुरुवात झाली आहे. सगळं अंग कोरडं पडलं असून कोरडेपणामुळे त्वचा सुरकुतल्यासारखी वाटते आहे. २. अनेक जणांना तर चेहऱ्याची त्वचा कोरडी पडल्याने काळवंडलेली वाटते आहे. शिवाय हातापायाची त्वचा सैलसर होऊन सुरकुतल्यासारखी वाटते आहे. ३. थंडीमुळे असा त्रास सुरू झाला असेल तर योग्य तेल वापरून संपूर्ण शरीराला मालिश करणं, केव्हाही अधिक चांगलं. यासाठी खूप काही वेगळं करण्याची अजिबात गरज नाही. ४. आपल्या घरात खोबरेल तेल असतंच. हे तेल कोमट करा आणि त्याने संपूर्ण शरीराला आठवड्यातून २ वेळा मालिश करा. मालिश केल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने आंघोळ करावी. मालिश करताना मध्यम आकाराची पाव वाटी तेल अंगात मुरेल अशा पद्धतीने मालिश करा. हिवाळ्यात खोबरेल तेलाने शरीराला मालिश करण्याचे फायदे पुढील प्रमाणे... ५. कोमट तेलात चिमूटभर हळद घालून चेहऱ्याला मालिश केली तर त्वचा सैलसर होत नाही. तसेच ॲक्ने, पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते. ६. नारळाच्या तेलामध्ये सॅच्यूरेटेड फॅट्स, ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी ऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. ते त्वचेसाठी पोषक ठरतात. ७. शिवाय नारळाच्या तेलामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के देखील भरपूर प्रमाणात असतात. ८. ज्यांची त्वचा खूप ऑईली आहे, त्यांनी चेहऱ्याला मालिश करताना कमी प्रमाणात नारळाचं तेल वापरावं. ९. ज्यांना पिंपल्स येण्याचा त्रास आहे, त्यांनी चेहऱ्याला खोबरेल तेलाने मालिश करू नये. टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडीBeauty TipsSkin Care TipsWinter Care TipsHome remedy