Join us   

दसरा स्पेशल : ट्रॅडिशनलही नको आणि एकदम मॉडर्नही नको! ५ टिप्स- दसऱ्याला ‘असा’ करा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 12:48 PM

1 / 9
दसऱ्याच्या तयारीला आता घरोघरी सुरुवात झाली आहे (Dussehra 2024). दसरा- दिवाळी हे मोठे सण. त्यामुळे या सणांच्या निमित्ताने कपड्यांची खरेदी, आपला लूक, हेअरस्टाईल याकडे अनेकींचे बारकाईने लक्ष असते.(how to look stylish in festive season?)
2 / 9
जर तुम्हाला यावर्षी दसऱ्याला एकदम हटके लूक करायचा असेल तर या काही टिप्स तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतील. खूप मॉडर्न लूक करण्याचीही इच्छा नसेल आणि एकदम टिपिकल पद्धतीने केलेला पारंपरिक लूकही आवडत नसेल तर दोन्हींचं हे एक मस्त कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.(best saree look for festival)
3 / 9
हा एक लूक पाहा. यापेक्षा नेहमीपेक्षा खूप सैलसर ब्लाऊज घातलं आहे. एरवी एखाद्या घागऱ्यावर किंवा लेहेंग्यावर असं ब्लाऊज घालतात. असा काहीसा लूकही तुम्ही करू शकता.(how to look stylish in traditional saree?)
4 / 9
थोडी डिझायनर पद्धतीची साडी आणि त्यावर असं डिझायनर, हेवी वर्क असणारं ब्लाऊज आणि स्टायलिश हेअरस्टाईल तुम्हाला खूप सुंदर, आकर्षक लूक देते.
5 / 9
काजोलचा हा एक लूक पाहा. तिने साडी अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने नेसली आहे. पण तिचं ब्लाऊज, हेअरस्टाईल आणि दागिने लेटेस्ट फॅशनचे आहेत.
6 / 9
साडीचा पदर एकदम हटके पद्धतीने घेतल्यामुळे हा लूक पुर्णपणे बदलला आहे. असा काहीसा बदल तुम्ही नक्कीच करून पाहू शकता.
7 / 9
प्लेन साडी आणि त्यावर हेवी वर्क असणारं ब्लाऊज, तसेच मोकळे सोडलेले केस आणि त्यावर मॉडर्न दागिने हा लूक तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नेहमीच चार चाँद लावणारा ठरतो.
8 / 9
सोनालीचा हा एक खास लूक पाहा. यामध्ये तिने नऊवार नेसली आहे. पण ती सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने. शिवाय ब्लाऊजही स्टायलिश असून बाकी दागिने पारंपरिक धाटणीचे ठेवले आहेत.
9 / 9
टॅग्स : ब्यूटी टिप्ससाडी नेसणेस्टायलिंग टिप्समेकअप टिप्सदसरा