फक्त २ पदार्थ नियमितपणे खा आणि केसांची- त्वचेची काळजीच विसरा- आहारतज्ज्ञांचा खास सल्ला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2024 9:14 AM 1 / 7केस गळणे, केसांची वाढ न होणे, कमी वयातच पांढरे होणे, डोक्यात कोंडा होणे अशा केसांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.2 / 7शिवाय त्वचेशी संबंधित तक्रारीही आहेतच. ॲक्ने, पिंपल्सचा त्रासही वाढला आहे. कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात झाली आहे. त्वचा डल दिसू लागली आहे. 3 / 7याचं कारण म्हणजे आपल्या त्वचेला आणि केसांना धूर, धूळ, प्रदुषण, ऊन या सगळ्या गोष्टींचा रोजच सामना करावा लागतो. 4 / 7केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी कमी करण्यासाठी मग आपण वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरतो. पण असं करण्यापेक्षा तुमच्या आहारात जर २ पदार्थ नियमितपणे घेतले तर त्वचेच्या आणि केसांच्या सगळ्याच तक्रारी कायमस्वरुपी कमी होतील, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा सांगत आहेत.5 / 7पुजा माखिजा यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी जे दोन पदार्थ खायला सांगितले आहेत, त्यापैकी पहिला पदार्थ आहे जवस.6 / 7जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३ असतं. जे केस आणि त्वचा दोन्हींच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं. त्यामुळे दररोज २ टेबलस्पून जवस न विसरता खा असा सल्ला त्यांनी दिला आहे.7 / 7त्यांनी सांगितलेला दुसरा पदार्थ आहे कडिपत्ता. दररोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कडिपत्त्याची १० ते १५ पाने तुमच्या पोटात गेलीच पाहिजेत, असं त्यांनी नमूद केलं आहे. हे दोन पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास दिवसेंदिवस तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य बहरतच जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications