Join us   

चष्म्याचा कॉम्प्लेक्स कशाला? चष्मा लावूनही दिसू शकता स्टायलिश.. बघा 'फॅशन विथ चष्मा'चे १० आकर्षक लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:36 PM

1 / 10
१. मेकअप केल्यानंतर किंवा एखाद्या पार्टीला जाताना चष्मा घालण्याचा कंटाळा येतो, खूप कॉम्प्लेक्स येतो... पण असं वाटून घेण्याची मुळीच गरज नाही. कारण हे बघा फॅशन विथ चष्माचे १० आकर्षक पर्याय..
2 / 10
२. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. एखाद्या लग्नाला किंवा समारंभाला जाताना अशा पद्धतीचा चष्मा आणि हलका मेकअप नक्कीच तुम्हाला स्टायलिश लूक देऊ शकतो. .
3 / 10
३. साडी नेसूनही चष्मा लावल्यानंतर तुम्ही अतिशय आकर्षक दिसू शकता. राणी मुखर्जी आणि कंगणा यांचे हे फोटो बघा.. सोबर साडी विथ सोबर चष्मा असा लूक केला की नक्कीच तो आकर्षक दिसतो.
4 / 10
४. फॅशनिस्टा सोनम कपूरचा हा एक लूक असाच एक खास.. मोठी टिकली, मोठे गळ्यातले आणि त्यावर लावलेला चष्मा तिला अतिशय सूट होतो.
5 / 10
५. ऐश्वर्या रायचा हा बघा एक पार्टी लूक.. चष्मा लावूनही ती किती आकर्षक दिसते आहे, असाच स्टायलिश लूक तुम्हालाही जमू शकतो.
6 / 10
६. श्रद्धा कपूरचा हा पार्टी लूक चष्म्यामुळे अधिक आकर्षक दिसतो आहे.. त्यामुळे पार्टीला जाताना चष्मा लावण्याबाबत कॉम्प्लेक्स वाटून घेण्याची काहीही गरज नाहीच..
7 / 10
७. किरण रावदेखील तिच्या चष्म्यामध्ये नेहमीच स्मार्ट दिसते. साडी घातलेला ट्रॅडिशनल लूक असो किंवा मग वेस्टर्न लूक.. ती नेहमीच चष्मा अतिशय आत्मविश्वासाने घालते.
8 / 10
८. विद्या बालनचा हा चष्मा तिला अधिक मॅच्युअर लूक देणारा ठरला आहे.. कधीकधी आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप टाकण्यासाठी चष्मा खूप मदत करतो.
9 / 10
९. एखाद्या पार्टीसाठी किंवा लग्नसमारंभासाठी तयार झाल्यावर अशा पद्धतीने चष्मा लावणं नक्कीच कॅची दिसू शकतं.
10 / 10
१०. चष्मा लावणंही खूप गोड, लाघवी दिसू शकतं.. त्यासाठी फक्त आपलं ड्रेसिंग आणि चष्माच्या रंग, आकार या गोष्टी अशा प्रकारे परफेक्ट मॅच झाल्या पाहिजेत.
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशनसेलिब्रिटी