मेथी दाण्यांचा ‘असा’ हेअरमास्क लावा, पार्लरमधल्या स्पापेक्षा भारी-डोक्यातला कोंडाही जाईल आणि केस चमकतील
Updated:April 17, 2025 09:05 IST2025-04-17T09:00:00+5:302025-04-17T09:05:02+5:30
fenugreek seeds hair mask: homemade hair mask for dandruff: fenugreek for hair fall control: how to use fenugreek for hair growth: केसांना पोषण आणि वाढीसाठी विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

आपले केस लांबसडक- घनदाट असावे असे प्रत्येकाला वाटतं असते. जे आपल्या सौंदर्यात भर घालतात. परंतु, खराब जीवनशैली आणि प्रदूषणाचा आपल्याला केसांवर परिणाम होतो. (fenugreek seeds hair mask)
केसगळती, केसात कोंडा होणे आणि केसांचे विरळ होणे ही समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते आहे. केसांना पोषण आणि वाढीसाठी विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे. (homemade hair mask for dandruff)
मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे केस मजबूत होऊन केसगळती कमी होते.
केसांना अधिक सुंदर आणि मुलायम करण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन केसांना स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, केरेटिन किंवा हेअर स्पा करतो. परंतु, कमी खर्चात आपण घरच्या घरी हेअर स्पा करु शकतो.
मेथी दाणे आणि दहीचा हेअर मास्क केसांच्या वाढीस चालना देतात. यासोबतच ते टाळू स्वच्छ करतात. केसांना मऊ आणि चमकदार बनवतात. हा हेअर मास्क आपल्या टाळूसह केसांवर ३० मिनिटे लावा. नंतर केस धुवा.
मेथी दाणे अंड्याचा हेअर मास्क केसांना मजबूत आणि निरोगी बनवतो. हा मास्क केसांना लावून ३० मिनिटे ठेवा. नंतर केस शॅम्पूने धुवा.
मेथी दाणे आणि कोरफडीचा हेअर मास्क केसांना पोषण देऊन केस वाढण्यास मदत होते. तसेच केस मजबूत आणि चमकदार होतात. ३० मिनिटे केसांना लावून नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा.