कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

Published:July 5, 2022 03:41 PM2022-07-05T15:41:39+5:302022-07-05T17:35:23+5:30

Food For Hair Growth Faster : जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही काही गोष्टींना तुमच्या आहारात समावेश करून आणि केसांची निगा राखून नियमितपणे केस गळतीवर नियंत्रण ठेवू शकता.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

बदलते हवामान असो किंवा ताणतणाव, कारण काहीही असो, पण केस गळणे (Hair Fall Problem) तुम्हाला तणावात टाकते. यामुळेच केसगळती रोखण्यासाठी लोक उत्पादनांवर हजारो रुपये खर्च करतात. तथापि, त्यापैकी बहुतेक हे विसरतात की मजबूत केसांसाठी, अन्नाशी संबंधित गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Best Foods for Hair Growth)

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही काही गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करून आणि केसांची निगा राखून नियमितपणे केस गळतीवर नियंत्रण ठेवू शकता. (Food For Hair Growth Faster) प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर बत्रा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. (10 foods to prevent hair loss and promote growth as told by doctor batra)

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

बीटच्या रसानं पौष्टिक घटकांची कमतरता दूर करण्यास मदत करतो. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि प्रो टीन असते. हे घटक एकत्रितपणे केसांना मुळांपासून मजबूत करतात. यासोबतच टाळूही निरोगी होते आणि केसांची गुणवत्ता सुधारते

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

बहुतेक लोकांना ग्रीन टीचे आरोग्य फायदे माहीत आहेत. खूप कमी लोकांना माहित आहे की या चहामुळे केस गळणे देखील कमी होते. ग्रीन टी follicles पुनरुज्जीवित करताना केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. डॉ बत्रा यांच्या मते, रोज एक कप ग्री टीमुळे केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

डॉ बत्रा यांच्या मते केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्हिटॅमिन-सीची कमतरता. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. आवळा खाणं आणि रस पिण्यासोबतच त्याचा रस थेट टाळूवर लावता येतो. हे केसांसाठी टॉनिकपेक्षा कमी नाही.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

कडुलिंब हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. केसगळती रोखण्यासाठी मास्क म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. ते बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने उकळवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवा. केस धुत्ल्यानंतर ही पेस्ट लावा. 30 मिनिटांनी पुन्हा पाण्यानं केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

पालक लोह, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि प्रोटीनचा स्रोत आहे. केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे लोहाची कमतरता. अशा स्थितीत पालक ही कमतरता तर दूर करेलच, पण त्यात असलेले नैसर्गिक सेबम केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करेल. या भाजीमध्ये असलेले ओमेगा-३ अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील टाळूचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

जर तुम्हाला लांब आणि मजबूत केस हवे असतील तर तुमच्या आहारात गाजराचा समावेश नक्की करा. व्हिटॅमिन-ए समृद्ध गाजर केसांच्या वाढीस मदत करते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे गाजर खाणे ही समस्या नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

यामध्ये असलेले सल्फर केस गळणे थांबवते. हे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांचे कूप मजबूत होतात आणि केस निरोगी होतात.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

टाळूवर कोरफडीचा गर लावण्यासोबतच रोज एक चमचा कोरफडीच्या गराचे सेवन केल्याने केस गळणे कमी होते.

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

अंडी, दूध, दही यासारख्या गोष्टी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आणि जस्त यांचे स्रोत आहेत. हे घटक मिळून केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात

कंगवा फिरवताच केस गळून हातात येतात? १० पदार्थ खा; केस राहतील कायम लांबसडक - दाट

बायोटिन, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-ई, प्रोटीन, मॅग्नेशियम समृद्ध अक्रोड केस गळतीवर नियंत्रण ठेवते.