French model : जगातली सगळ्यात 'खुबसूरत' तरूणी पाहिली का? वयाच्या चौथ्या वर्षापासून करतेय रॅम्प वॉक By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 2:54 PM 1 / 8कमी वयातच आपल्या लूक्समुळे चर्चेत असलेली फ्रेंच मॉडेल थायलेन ब्लॉन्डेऊ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच ती आपल्या बॉयफ्रेडसह इन्जॉय करताना दिसली. थायलेननं सगळ्यात आधी वयाच्या सहाव्यावर्षी जगातील सगळ्यात सुंदर मुलगी असल्याची ओळख माध्यमातून मिळवली होती. 2 / 8२००७ मध्ये थायलेनला TC Candler च्या १०० सुंदर चेहऱ्यांच्या लिस्टमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. या लिस्टमध्ये प्रियांका चोप्रासारख्या मोठ्या हॉलिवूड अभनेत्रींचा समावेश होता. त्याच्या २ वर्ष आधीपासूनच तिनं मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं. 3 / 8वयाच्या चौथ्या वर्षापासून तिनं रॅम्पवॉक करायला सुरूवात केली होती. त्यावेळी ती सगळ्यात लहान वयातील रॅम्पवॉकर होती. तिची आई फॅशन डिजायनर असल्यानं तिला फॅशन क्षेत्रात लहानपणापासूनच रस होता. तिचे लहानपणीचे फोटोसुद्धा तुफान व्हायरल झाले. 4 / 8वयाच्या १० व्या वर्षी ती वादात सापडली होती. कारण फोटोशूटदरम्यान गोल्ड ड्रेस, हाय हिल्स आणि मेकअपमध्ये ती दिसून आली होती. या फोटोत दिसणारा तिचा सोन्याचा नेकलेस ३ मिलियन पाऊंड्सचा होता. 5 / 8चाईल्ड मॉडेलिंगच्या यशस्वी करिअरनंतर फॅशन जगतात तिनं आपलं नाव कमावलं. २०१७ मध्ये मिलान फॅशन वीकमध्ये तरूण मॉडेलच्या स्वरूपात तिनं सुरूवात केली. त्यानंतर L'oreal ब्रॅण्डनं तिला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं. मग तिनं स्वतःचा क्लोथिंग ब्रॅण्ड सुरू केला. 6 / 8थायलेन माजी फुटबॉलपटू पॅट्रिक ब्लॉन्डएयू आणि फ्रेंच मॉडल वेरोनिकाची मुलगी आहे. थायलेन आता २० वर्षांची झाली असून अनेक टॉप ब्रॅण्ड्सचा चेहरा आहे.7 / 8(All image Credit- Thylane Blondeau Instagram)8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications