Join us   

गणेशोत्सवात करा दृष्ट लागण्यासासारखा नऊवारी साडीतला लूक, पारंपारीक आकर्षक साज-पाहा सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:03 PM

1 / 10
गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2024) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. घरात गणपती आगमन असो किंवा बाहेर गणपतीच्या दर्शनाला जायचं असो आपण आकर्षक सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. सणासुधीला साडी नेसायला प्रत्येकालाच आवडते. साडी नेसल्यानं चेहऱ्याला एक वेगळाच लूक येतो. (Nauvari Saree Look For Ganpati Festival Inspired by Marathi Actress)
2 / 10
नऊवारी नेसण्याच्या विचारात असाल तर मराठी अभिनेत्रींचे नववारी लूक तुम्हाला फार आवडतील. यात तुम्हाला पारंपारीक तितकाच मॉडर्न लूक मिळेल.
3 / 10
या अभिनेत्रीच्या साडी स्टायलिंगप्रमाणेच दागिन्यांची निवडही तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन किंवा बाजारात तुम्हाला अशा ज्वेलरीज सहज मिळतील.
4 / 10
आपल्या अंगाला चापून चोपून बसेल अशी नऊवारी शिवून घ्या किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून नेसून घ्या.
5 / 10
ब्राम्हणी स्टाईलची नऊवारी आजही मोठ्या प्रमाणात नेसली जाते. तुम्ही याव्यतिरिक्त राजलक्ष्मी, पेशवाई या प्रकारच्या नऊवारी साड्या नेसू शकता.
6 / 10
जर तुमची साडी सिल्व्हर बॉर्डरची असेल तर त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी शोभून दिसेल.
7 / 10
नऊवारी साडीवर जर तुम्ही मोत्याची ज्वेलरी घालणार असाल तर पूर्ण मोत्यांचा सेट घाला. गोल्डन आणि मोती असे दोन्ही प्रकारचे दागिने घातल्यास फार चांगले दिसणार नाही.
8 / 10
नऊवारी साडीवर केसांचा मेसी बन उठून दिसेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
9 / 10
नऊवारी साडीच्या ब्लाऊजवर तुम्ही हेवी वर्क शिवून घेऊ शकता किंवा त्यावर पॅचेच लावून मिळतील.
10 / 10
(Image Credit _ Social Media)
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशनखरेदी