गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 11:10 AM 1 / 8 गौरी-गणपती हा वर्षातील मोठा सण असल्याने या काळात आपण मस्त सजतो. साडी, मेकअप, दागिने हे तर ओघाने आलेच पण हेअरस्टाईल काय करावी हे अनेकदा आपल्याला समजत नाही. 2 / 8मेसी बन हा गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडींग असणारा एक खास प्रकार. मेसी असला तरी हा बन साडी किंवा ड्रेसवरही अतिशय खुलून दिसतो. आपले केस लहान असतील तर बाजारात अशा प्रकारचे बन विकत मिळतात. 3 / 8कोणत्याही प्रकारचा साईड बन किंवा फ्रेंच रोल घालून त्यावर अशाप्रकारच्या आकर्षक अॅक्सेसरीज लावल्यास हेअरलस्टाइल नकळत खुलून येण्यास मदत होते. 4 / 8वेणी पुन्हा एकदा फॅशन इन असल्याने सागर वेणी किंवा पाचपेडी वेणी आपण नक्की घालू शकतो. 5 / 8 केस मस्त कुरळे असतील आणि मोकळे सोडायचे असतील तर अशाप्रकारे केसांची मध्यभागी वेणी घालायची आणि खालचे केस छान मोकळे सोडायचे. 6 / 8पोनी टेल हा अतिशय साधा वाटणारा मात्र कोणत्याही काळात, कोणत्याही कपड्यांवर छान दिसणारा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता.7 / 8मध्यभागी छान बन घालून त्याच्या बाजुने छानसा पारंपरिक गजरा किंवा छानसे डेकोरेटीव्ह काही लावल्यास आपला लूक खुलून यायला मदत होते. 8 / 8दोन्ही बाजुने मस्त नाजूक वेण्या घालून त्या मध्यभागी टक केल्यास ही हेअरस्टाइल आपल्याला फार छान लूक देऊन जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications