Ghee Benefits for Skin : रात्री फक्त १ चमचा तूप चेहऱ्यावर लावा! तूप लावून येईल रूप, पाहा वापराची योग्य पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 8:28 PM 1 / 6तूप तब्येतीसाठी खूप पोषक असते. यात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. औषधी गुणधर्मांमुळे तुपाचा वापर आयुर्वेदात महत्वाचा मानला जातो. त्वचेसाठी तूप खूपच फायदेशीर आहे. (Ghee Benefits for Skin) तूपाचा वापर करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता. याशिवाय केसही चमकदार होतात. (3 Best Ways To Use Ghee for Skin)2 / 6हिवाळ्यात जर तुम्हाला त्वचा खूपच कोरडी झाल्याप्रमाणे वाटत असेल तर त्वचेला मऊ बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूपाचा फेसपॅकही घरी तयार करता येतो. त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी २ ते ३ थेंब तुपानं त्वचेला मसाज करणं गरेजेचं आहे. 3 / 6त्वचा सुंदर आणि ग्लोईंग दिसावी असं वाटत असेल तर रोज २ ते ३ थेंब तूप त्वचेला लावून ५ मिनिटांपर्यंत मसाज करा. मालिश करण्याआधी तोंड स्वच्छ धुवून घ्या आणि टोनर लावा. त्यानंतर त्वचेवर लूप लावा. हा उपाय दररोज केल्यास त्वचेला छान ग्लो करेल. 4 / 6कोरड्या त्वचेसाठी तूप खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला आतून पोषण देते तसेच मॉइश्चरायझेशन ठेवते. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तूप आणि बेसनाचा फेस पॅक लावू शकता. हे काढताना चेहऱ्यावर थोडे गुलाबपाणी शिंपडा आणि हलक्या हातांनी चेहरा स्वच्छ करा. यामुळे मृत त्वचेचा थर निघून जाईल आणि तूप तुमच्या त्वचेच्या पेशींना आर्द्रतेने भरण्यास मदत करते.5 / 6त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही बेसन आणि तुपाचा फेस पॅक लावू शकता, असे केल्याने तुमची त्वचा सुधारेल. हा फेस पॅक लावल्याने चेहरा तजेलदार दिसेल. 6 / 6त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही बेसन आणि तुपाचा फेस पॅक लावू शकता, असे केल्याने तुमची त्वचा सुधारेल. हा फेस पॅक लावल्याने चेहरा तजेलदार दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications