Gold facial like glow just in 10 Rs, how to do gold facial at home? 4 Easy steps for gold facial
पार्लरमध्ये जायला वेळच नाही? फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फेशियल, गोल्ड फेशियलसारखा चमकेल चेहराPublished:November 7, 2023 05:22 PM2023-11-07T17:22:01+5:302023-11-07T17:26:44+5:30Join usJoin usNext दिवाळीची सगळी कामं केल्यानंतर स्वत:च्या चेहऱ्याकडे लक्ष जाते. पण तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे मग पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नाही. असं तुमचंही झालं असेल किंवा मग पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर फक्त १० रुपयांत घरच्याघरी फेशियल कसं करायचं ते पाहूया... अशा पद्धतीने फेशियल केलं तर अगदी गोल्ड फेशियलसारखा ग्लो चेहऱ्यावर दिसू लागेल.हा उपाय इन्स्टाग्रामच्या beauty__secrets_with_shalini या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा स्क्रब करायचं. ते करण्यासाठी टोमॅटो मधोमध अर्धा कापा. त्यात काटा चमचा वापरून थोडी छिद्र करा. त्यावर साखर आणि कॉफी पावडर टाका. हा टोमॅटो चेहऱ्यावर हळूवार हाताने चोळा आणि नंतर चेहरा धुवून टाका. यानंतर दुसरी स्टेप आहे वाफ घेण्याची. ५ मिनिटे वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स काढून टाका. तिसऱ्या स्टेपमध्ये चेहऱ्याला मसाज करायचा आहे. त्यासाठी दही आणि हळद हे मिश्रण एकत्र करा आणि त्याने ५ मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग निघून जाईल. यानंतर आता आपल्याला चेहऱ्याला फेसपॅक लावायचा आहे. यासाठी हरबरा डाळीचं पीठ, लिंबाचा रस, काॅफी पावडर आणि ॲलोव्हेरा जेल हे मिश्रण एकत्र करून त्याचा फेसपॅक करा आणि तो चेहऱ्यावर लावून घ्या. १० मिनिटे तो चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवून टाका. टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्सहोम रेमेडीDiwaliBeauty TipsHome remedy