फक्त १० रुपये खर्च करा आणि पांढरे केस काळे करण्याची युक्ती वापरा, ४ उपाय कायम दिसाल तरुण By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:53 PM 1 / 5केस पांढरे होणं ही आजकाल खूपच कॉमन समस्या बनली आहे. वयस्करच नाही तर तरूणांमध्येही ही समस्या जाणवते. स्ट्रेटनिंग, केस रंगवणं असे प्रयोग आजकाल खूपजण केसांवर करतात. केमिकल्सच्या अतिवापरानं केसांचं खूप नुकसान होतं आणि केसं पांढरे दिसू लागतात. पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूया. अगदी १० ते २० रूपये खर्च करून तुम्ही हे सोपे उपाय करू शकता. (White hair grey hair home remedy for white beard)2 / 5 केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी कांद्याचा रस वापरता येतो. यासाठी २ चमचे कांद्याचा रस, पुदिन्याची पानं आणि अर्धी वाटी बटाटे एकत्र करून घ्या. हे मिश्रण केसांना लावा. यामुळे पिकलेले केस पुन्हा काळे होतील.3 / 5 दाढी आणि केस काळे करण्यासाठी तुम्ही गाईच्या दुधापासून घरी बनवलेले तूप वापरू शकता. या तूपानं मसाज करावी लागते. मसाज करण्यासाठी नेहमी हलक्या हातांचा वापर करा.4 / 5केस काळे करण्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. हे लावण्यासाठी सर्वप्रथम तुरटी बारीक करून त्याची पावडर बनवा. त्यानंतर त्या पावडरमध्ये गुलाबजल मिसळा आणि नंतर हे मिश्रण केसांना लावा. 5 / 5केस काळे करण्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता उकळवून घ्या आणि नंतर पांढऱ्या कसांवर या तेलानं मालिश करा. 100 मिली पाण्यात कढीपत्ता उकळून अर्धे पाणी प्यायचे असेल तर ते हळूहळू प्यावे. म्हणजे तुमची पांढरी दाढी आणि केस काळे होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications