गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:34 AM 1 / 10 गुढी पाडव्याला अवघे काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. पाडव्यासाठी नवीन साड्या, दागिने अशी खरेदीची लगबग सुरू असणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नववारी किंवा सहावारी पारंपारीक साडी नेसून उत्सव साजरा करतात. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas)2 / 10सध्या आर्टिफिशल ज्वलेरीची क्रेझ तरूणींमध्ये आहे. नववारी किंवा सहावारी साडीवरही शोभून दिसतील असे दागिने कमीत कमी किमतीत तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन घेऊ शकता. 3 / 10आर्टिफिशल दागिने म्हटलं की पैसे वाया जातील, काळे पडतील अशी भिती असते. पण नवीन डिजाईन्ससह सध्या येणारी ज्वेलरी टिकायलाही चांगली आहे. फक्त वापर झाल्यानंतर वर न ठेवता ही ज्वेलरी तुम्ही व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवायला हवी. 4 / 10 जर गळ्यात जास्त जड काही घालायला आवडत नसेल तर तुम्ही नथ आणि पारंपारीक ठुशी त्यावर साजेसे गोल्डन किंवा मोत्याचे कानातले घालू शकता.5 / 10हाता साडीच्या रंगाच्या बांगड्या किंवा गोल्डन, ऑक्साईडचे तोडे, कडे, पाटल्या शोभून दिसतील.6 / 10चिंचपेटी या प्रकारात तुम्हाला बरेच ऑपश्नस पाहायला मिळतील. १०० रुपयांपासून ते २००० हजार रुपयांपर्यंत आपल्याला आवडतील तसे हव्या त्या डिजाईनचे नेकपिस तुम्ही घेऊ शकता. 7 / 10कानात भिकबाळी, बुगडी घातल्यास साडीचा लूक अधिक खुलून येईल.8 / 10नवावारी साडीवर कोल्हापूरी साज किंवा टेंम्पल ज्वेलरीसुद्धा गुढीपाडव्याला ट्राय करू शकता.9 / 10कानांतल्यांवर मॅचिंग असणारा हार गळ्याची शोभा वाढवेल. यावर साजेश्या बांगड्याची निवड तुम्ही करा. 10 / 10(Image Credit - Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications