केसांसाठी खास टॉनिक आहेत ६ पदार्थ, रोज खा - झाडूसारखे रखरखीत केसही होतील मऊ- चमकदार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 2:39 PM 1 / 9१. केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. धुळ, प्रदुषण, वेगवेगळ्या केमिकल्सचा मारा यामुळे केस गळणे (hair fall), केसांत वारंवार कोंडा होणे (dandruff), कमी वयातच केस पांढरे (gray hair) होणे असे त्रास बहुतांश जणांना होत आहेत.2 / 9२. यात पुन्हा आणखी भर पडते ती आपल्या बदललेल्या जीवनशैलीची आणि आहाराची. व्यायामाचा अभाव तर आहेच पण बऱ्याचदा फास्टफूड, जंकफूड खाऊन पोट भरले जाते. त्यामुळे केसांसाठी पोषक ठरणारे पदार्थ आहारातूनही न मिळाल्याने केसांचा पोत आणखीनच खराब होत जातो. 3 / 9३. म्हणूनच तर आहारात थोडा बदल करा आणि केसांसाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करणारे हे ६ अन्नपदार्थ दररोज तुमच्या जेवणात असतील, याकडे लक्ष द्या. नियमितपणे हे सगळे पदार्थ खाल्ल्यास अवघ्या एक- दोन महिन्यांतच केसांमध्ये खूपच चांगला फरक दिसून येईल.4 / 9४. केसांसाठी दही खाणे अतिशय चांगले आहे. ७५ ते ९० ग्रॅम दही दररोज खावे. फ्रिजमधून काढलेले थंड, जुने दही खाऊ नका. रुम टेम्परेचरला असलेले ताजे दही खावे. त्यात चव म्हणूनच थोडीशी साखर किंवा मीठ घालायला हरकत नाही. दह्यातले ॲण्टीबॅक्टेरियल घटक, फॅटी ॲसिड केसांना पोषण देतात.5 / 9५. हिरव्या सालीची मुगाची डाळदेखील केसांसाठी अतिशय गुणकारी असते. त्याला काही भागांत पाठीची डाळही म्हणतात. खिचडी, वरण, धीरडे किंवा वडे या माध्यमातून ही डाळ खाता येते. प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन बी यातून चांगल्या प्रमाणात मिळते. आठवड्यातून ३- ४ दिवस तरी एक वाटी हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीचे वरण खावे.6 / 9६. काळ्या मनुका केसांसाठी अतिशय पौष्टिक आहेत. दररोज रात्री झोपताना ७ ते ८ मनुका भिजत टाका आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. त्यातून भरपूर प्रमाणात मिळणारे लोह केसांसाठी पोषक ठरते.7 / 9७. आपण फक्त संक्रांत असेल तेव्हाच तीळ खातो. पण केसांसाठी रोज १ टीस्पून भाजलेले तीळ खावेत. दिवसातून कधीही खाऊ शकता. हवं तर जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणूनच तीळ खा. पण तीळ भाजूनच खा, नाहीतर अपचनाचा त्रास होऊ शकतो.8 / 9८. अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर आपल्याकडे फक्त बाळांतिणीलाच देतात. पण ते सगळ्यांसाठीच पौष्टिक असतात. केसांसाठी अळीव खाणार असाल तर अर्धा टीस्पून अळीव दूधात किंवा पाण्यात भिजत घाला. ५ ते ६ तास चांगले भिजल्यानंतर रात्री झोपण्यापुर्वी खा.9 / 9९. कढीपत्ता केसांसाठी किती फायदेशीर आहे, हे आपण जाणतोच. दररोज कढीपत्त्याची ३ ते ५ पाने सकाळी रिकाम्यापोटी खाणे, केसांसाठी अतिशय पोषक आहे. हे सगळे उपाय नियमितपणे केल्यास १- २ महिन्यांतच केसांच्या अनेक समस्या कमी झाल्याचे दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications