1 / 6हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते.(best home remedies for reducing hair fall)2 / 6हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय करावा तसेच केसांची वाढ होण्यासाठी (best hair oil for fast hair growth), गळणं कमी करण्यासाठी काय करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ vaidya_mihir_khatri या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to make dry hair smooth and shiny?)3 / 6यामध्ये डॉक्टर सांगतात की खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि तिळाचं तेल सम प्रमाणात एकत्र करून एका वाटीमध्ये घ्या.4 / 6त्यानंतर गरम पाण्यात ही वाटी ठेवून डबल बॉईलिंग पद्धतीने हे तेल गरम करा.5 / 6या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा. दोन ते तीन तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.6 / 6नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या २ ते ३ आठवड्यांतच केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल.