Join us   

हिवाळ्यात केस कोरडे झाल्याने फाटे फुटण्याचं प्रमाण वाढतं.. ५ उपाय, स्प्लिट हेअरचा त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 4:42 PM

1 / 8
१. हिवाळ्यात थंडीमुळे अंग कोरडे पडण्याचं प्रमाण वाढतं. स्काल्प (dry scalp) म्हणजेच डोक्याची त्वचाही त्याला अपवाद नाही. यादिवसांत डोक्याची त्वचाही कोरडी पडते.
2 / 8
२. त्यामुळे मग केसांमध्ये कोंडा (dandruff) होण्याचं प्रमाण वाढतं. डोक्याच्या त्वचेमधलं नॅचरल मॉईश्चर कमी झाल्याने केस कोरडे पडायला सुरुवात होते.
3 / 8
३. अशावेळी जर केसांना योग्य पोषण मिळालं नाही, तर मग केस अधिकच कोरडे होऊन त्यांना फाटे फुटायला (split hair) सुरुवात होते. अशा पद्धतीने केसांचं नुकसान होऊ नये, म्हणून हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा.
4 / 8
४. आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा केस धुवू नका. तसेच प्रत्येक वेळी केस धुताना शाम्पू वापरण्याचं प्रमाण मर्यादित ठेवा. तसेच केस धुण्यासाठी खूप कडक पाणी वापरणं टाळा.
5 / 8
५. हिवाळ्याच्या दिवसांत केसांवर स्ट्रेटनिंग, कर्ल्स अशा कोणत्याही हिटिंग ट्रिटमेंट देणं शक्य तेवढ्या कमी करा. कोरड्या केसांना हिट दिल्याने त्यांच्यातला कोरडेपणा आणखीन वाढतो.
6 / 8
६. या दिवसांत केसांवर कोरफडीचा गर लावणे अधिक फायदेशीर ठरते. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत कोरफडीचा गर लावा. साधारण ४० मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.
7 / 8
७. आठवड्यातून २ वेळा तेलाने मसाज करायला विसरू नका.
8 / 8
८. १ चमचा दही, १ चमचा मध आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल हा हेअरपॅक तयार करा. तो केसांच्या मुळांशी तसेच केसांच्या टाेकांवर लावा. अर्ध्यातासाने केस धुवून टाका. केसांना छान पोषण मिळेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजी