Join us   

केस झपाट्याने पांढरे होत आहेत? शरीरातलं मेलॅनीन वाढविण्यासाठी डॉक्टर सांगतात ५ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 7:03 PM

1 / 9
कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सध्या खूपच वाढली आहे. अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही नियमितपणे हेअर डाय करावा लागत आहे किंवा केसांना मेहंदी लावावी लागत आहे.
2 / 9
केस काळे राहण्यासाठी मेलॅनीन हा घटक खूप गरजेचा असतो. त्याचं प्रमाण कमी झालं की केस पांढरे होऊ लागतात. शरीरातील मेलॅनीन वाढण्यासाठी किंवा आहे ते मेलॅनीन कमी होऊ नये, यासाठी काय करावं, याविषयीची माहिती डॉ. कुना रामदास यांनी healthshots.com यांच्यासोबत शेअर केली आहे.
3 / 9
हार्मोन्स, जेनेटिक्स आणि आपली तब्येत यावर मेलॅनीनचे प्रमाण ठरत असते. तरीही काही गोष्टींच्या मदतीने आपल्याला मेलॅनीनची पातळी वाढवता येते. यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समतोल आहार. आपल्या आहारात व्हिटॅमिन ए, बी, बायोटीन, कॉपर आणि झिंक हे पदार्थ आवर्जून असतीलच याची काळजी घ्यावी.
4 / 9
दुसरी गोष्ट म्हणजे UV rays म्हणजेच अतिनील किरणांपासून केसांच्या मुळाचे संरक्षण केले पाहिजे. यासाठी उन्हात जाताना टोपी घाला किंवा रुमालाने सगळे केस झाकून घ्या. तासनतास उन्हात उभे राहणे टाळा.
5 / 9
स्काल्प म्हणजेच डोक्याच्या त्वचेला नियमितपणे मसाज केल्यानेही फायदा होतो. यामुळे डोक्याच्या त्वचेमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि त्याचा फायदा केसांना होतो.
6 / 9
योगा, प्राणायाम, ध्यानधारणा केल्यानेही मेलॅनीन वाढण्यास मदत होते.
7 / 9
आपल्या रोजच्या रुटीनमध्ये थोडा बदल करावा. स्मोकिंगचे व्यसन असल्यास ते सोडावे तसेच रात्रीचे जागरण, फास्टफूडचे सेवन टाळावे.
8 / 9
खूप ताण घेत असाल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या तब्येतीवर तसेच केसांवर दिसून येईल. त्यामुळे ताण घेऊ नका.
9 / 9
केसांवर सतत वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरू नका. जे कॉस्मेटिक्स हर्बल असतील, शक्यतो तेच वापरण्याचा प्रयत्न करा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीयोगासने प्रकार व फायदे