1 / 8केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावून मालिश करावी हे आपल्याला माहिती आहे. पण नेमकी कशी मालिश करावी, हे माहिती नसल्याने आणि खसाखस डोकं चोळतो. त्यामुळे केसांची मुळं दुखावली जातात आणि जास्तच केस गळतात.2 / 8केसांना मालिश केल्यानंतर ते जास्तच गळतात असा अनुभव तुम्हालाही येत असेल तर नेमकी मसाज कशी करावी, मसाज करताना कोणत्या चुका टाळाव्या हे एकदा पाहून घ्या. याविषयीची ही माहिती hairmegood या पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 8केसांच्या मुळाशी व्यवस्थित तेल लागावं यासाठी केसांची विभागणी करा आणि मग एकेका भागात हळूवार तेल लावा.4 / 8तळहाताने केसांच्या मुळाशी कधीही घासू नका. बोटांच्या टोकाने गोलाकार दिशेत केसांना मसाज करा.5 / 8तेल लावून मसाज केल्यानंतर लगेचच केस विंचरू नका.6 / 8थंड किंवा गरम तेलाने केसांना मसाज करू नका. मसाज करण्यासाठी जे तेल वापरात ते कोमट असावे.7 / 8डोक्याची त्वचा खूप घाण झाली असेल तर अशा घाण झालेल्या स्काल्पवर तेल लावू नका. कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही. 8 / 8केसांना तेल लावल्यानंतर १ ते ३ तास ते केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा.