केसांना तेल लावताना हमखास होणाऱ्या 6 चुका, तेल चोपडूनही केस होतात खराब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 9:25 AM 1 / 8महागड्या शाम्पूप्रमाणे महागडे तेल वापरले की आपल्या केसांच्या समस्या दूर होतील असे अनेकींना वाटते. (Avoid 6 Mistakes while applying hair oil) पण अशाप्रकारे कोणत्याही तेलाचा केस वाढण्यसाठी उपयोग व्हावा म्हणून तो लावताना काय काळजी घ्यावी हे लक्षात घ्यायला हवे (Hair Oiling Tips). 2 / 8केसांची चांगली वाढ व्हावी आणि पोषण व्हावे यासाठी आपण नियमितपणे केसांना तेल लावतो. पण ते लावताना कशाप्रकारे लावायला हवे याची माहिती नसल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. तर केसांना तेल लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे समजून घ्यायला हवे.3 / 8केसांना तेल लावताना ते थेट न लावता कायम थोडे कोमट करुन लावायला हवे. त्यामुळे केसांची मुळे आणि केस यांचे चांगले पोषण होते. हे तेल जास्त गरम न करता हलकेच कोमट करायला हवे. जास्त गरम झाल्यास त्यातली पोषण मूल्ये नष्ट होण्याची शक्यता असते. 4 / 8केसांना खूप जोरात मसाज केल्याने तेल केसांत मुरते असा आपला समज असतो. पण तसे केल्याने केसांची मुळे हलकी होतात आणि केस जास्त प्रमाणात गळतात किंवा तुटतात. त्यामुळे तेल लावताना हलक्या हाताने मसाज करायला हवा. 5 / 8केसांना तेल लावताना आधी केस स्वच्छ विंचरलेले असायला हवेत. त्यामुळे केसांतला गुंता तर निघतोच आणि सगळ्या केसांना चांगल्या पद्धतीने तेल लावता येते. केस न विंचरता तेल लावल्यास केस जास्त गुंततात, तुटतात त्यामुळे तसे करणे टाळावे.6 / 8आपण काहीवेळा योग्य ती माहिती न घेता दोन वेगळ्या प्रकारची तेलं एकत्र करतो आणि त्याने केसांना मसाज करतो. पण तसे करणे चुकीचे आहे. योग्य ती माहिती घेऊन ज्या तेलांचे एकमेकांशी कॉम्बिनेशन होऊ शकते अशीच तेलं एकत्र करायला हवीत. 7 / 8 केस खूप घट्ट बांधणे ही केस खराब होण्यातील आणखी एक महत्त्वाची चूक आहे. केसांना तेल लावल्यावर आपण केसांचा घट्ट पोनीटेल किंवा आंबाडा बांधतो. मात्र त्यामुळे केस गळण्याचे किंवा तुटण्याचे प्रमाण वाढते. यापेक्षा केस मोकळे ठेवल्यास केसांच्या मूळांना पुरेसा ऑक्सिजन मिळण्यास मदत होते आणि लावलेले तेल केसांत चांगले मुरते. 8 / 8केसांना सतत तेलाने मसाज केल्यास केस लांबसडक आणि दाट होतील असे काहींना वाटते. त्यामुळे असे लोक आठवड्यातून तीन ते चार वेळा केसांना भरपूर तेलाने मसाज करतात. पण प्रत्यक्षात असे काहीच नसते. जास्त प्रमाणात तेल लावल्यास आपल्याला जास्त शाम्पू लावून हे तेल काढावे लागते. त्यामुळे केसांवर जास्त प्रमाणात रासायनिक उत्पादनांचा वापर होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications