Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

Published:March 31, 2022 12:14 PM2022-03-31T12:14:10+5:302022-03-31T12:34:01+5:30

Home Facial for Gudi Padwa : फेशियलची पहिली पायरी म्हणजे त्वचा साफ करणे.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

सणवार म्हटलं की महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल, ब्लीच, आयब्रोज असं सगळं करून घेतात. पण अनेकदा ऑफिसच्या वेळा घरच्या कामाची गडबड यांमुळे पार्लरला जायला वेळच मिळत नाही. (Skin Care Tips) रोजच्या गडबडीमुळे त्वचा निस्तेज झालेली असते. टवटवीत, तजेलदार त्वचेसाठी काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं. अन्यथा सनटॅनिंग, ब्लॅकहेट्स, डार्क सर्कल्स खूप वाढत जातात. (How to do facial at home)

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

म्हणून या लेखात गुढीपाडव्यासाठी (Gudi padwa 2022) घरच्याघरी फेशियल कसं करता येईल याच्या काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. गुढीपाडव्याच्या एक किंवा दोन दिवस आधी तुम्ही हे फेशियल करून ग्लोईंग चेहरा मिळवू शकता. (Easy Home Facial Steps for gudi padwa get glowing skin by easy steps)

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

फेशियलची पहिली पायरी म्हणजे त्वचा साफ करणे. यासाठी 2 चमचे ताजे कोरफडीचे जेल आणि 1 चमचे लिंबाचा रस घाला. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि ५ मिनिटे हलका मसाज करा. त्यानंतर कापसाने चेहरा स्वच्छ करा. असे केल्याने चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि माती साफ होते.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

आता स्क्रबच्या मदतीनं चेहऱ्याची डेड स्किन आणि अतिरिक्त तेल निघून जाईल. स्क्रबर बनवण्यासाठी 1 चमचे ब्राउन शुगर आणि 1 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये 2 चमचे कोरफड जेलचे मिश्रण करा आणि ते त्वचेवर लावा. त्यानंतर हळू हळू चेहऱ्यावर वर्तुळाकार गतीने मसाज करा. असे 2 ते 3 मिनिटे केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून पुसून टाका.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

चेहऱ्यावर वाफ घेतल्याने छिद्रे उघडतात आणि त्यामध्ये साचलेली घाण बाहेर येते. वाफ घेण्यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात कोणत्याही प्रकारचे इसेंशियल तेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या घाला. 3 मिनिटे वाफ घ्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे तुमचे छिद्र घट्ट होण्यास मदत करेल.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

मसाज क्रीमसाठी, 2 चमचे कोरफड जेल आणि 1 चमचे मध मिसळा. नंतर 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्यात टाका. त्याच वेळी, लाइटनिंग क्रीम बनवण्यासाठी, 1 टेबलस्पून एलोवेरा जेल, टेबलस्पून मध आणि 2 ते 3 चिमूटभर हळद मिसळा. या क्रिमने चेहऱ्याला 5 ते 10 मिनिटे बोटांनी मसाज करा. तुमच्या डोळ्यांच्या सभोवतालच्या भागापासून क्रीम दूर ठेवा. मसाज केल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा पुसण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

२ चमचे एलोवेरा जेल, २ चमचे गुलाबजल आणि १ चमचा चंदन पावडर किंवा मुलतानी माती मिक्स करून पेस्ट बनवा. तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी हा मास्क खूप चांगला आहे. आपल्या बोटांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावा. 15 ते 20 मिनिटे मास्क लावा. नंतर कोमट पाण्याने मास्क काढा.

Home Facial for Gudi Padwa : चेहरा खूप थकल्यासारखा, निस्तेज वाटतोय? गुढी पाडव्यासाठी घरच्याघरी फेशियल करून मिळवा ग्लोईंग चेहरा

चेहऱ्याची छिद्रे बंद करण्यासाठी त्यावर टोनर लावा. यासाठी कापसाचे गोळे गुलाब पाण्यात भिजवून चेहऱ्याला लावा. ५ मिनिटांनी एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा आणि पुसून घ्या. फेशियल केल्यानंतर कमीत कमी ३ दिवस साबण, फेसवॉश काहीही वापरू नका.