चमचाभर तांदूळ घेऊन करा 'हा' उपाय, त्वचेवर येईल सुंदर ग्लो; विकतचं क्रिम लावण्याची गरजच नाही
Updated:January 17, 2025 14:30 IST2025-01-17T14:26:06+5:302025-01-17T14:30:58+5:30

त्वचेवर छान ग्लो पाहिजे असेल तर त्यासाठी कोणतेही महागडे क्रिम लावण्याची गरज नाही.
त्यापेक्षा चमचाभर तांदूळ घेऊन घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्यानंतर तुम्हालाही कोरियन तरुणींसारखी चमकदार ग्लास स्किन मिळू शकते.. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयीची माहिती garvitt20 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी दोन चमचे तांदूळ घ्या. ते एक- दोन वेळा व्यवस्थित धुवा आणि नंतर अर्धा ग्लास पाण्यात भिजत घाला.
दुसऱ्यादिवशी तांदळातलं पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडं गुलाब पाणी घालून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावा. हे झालं तुमचं घरगुती टोनर तयार.
त्यानंतर भिजत घातलेले जे तांदूळ आहेत त्यामध्ये थोडं गुलाब पाणी आणि थोडं ग्लिसरिन घाला आणि ते मिक्सरमधून वाटून घ्या.
आता ही पेस्ट व्यवस्थित गाळून घ्या. जे पाणी वाटीत जमा झालेलं असेल त्या पाण्यात थोडा कोरफडीचा गर घाला. सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की तुमचं फेस सिरम झालं तयार.
वरील पद्धतीने तयार केलेलं टोनर रात्री चेहऱ्याला लावल्यानंतर हे सिरम चेहऱ्याला लावा. बघा काही दिवसांतच त्वचेवर किती छान ग्लो येतो..