'हे' ३ पदार्थ एकत्र कालवून केसांना लावा, ३ आठवड्यांतच केसांचे सगळे प्रॉब्लेम्स होतील गायब
Updated:February 20, 2025 16:36 IST2025-02-20T16:01:42+5:302025-02-20T16:36:17+5:30

केस खूप गळत असतील, केसांची अजिबातच वाढ होत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..
हा उपाय केल्याने केसांची मुळं पक्की होऊन केस तर छान वाढतीलच, पण केसांमधला कोंडाही बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
त्यासाठी नेमका काय उपाय करायचा याविषयीची माहिती the_mumta_podcast या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये ३०० मिली पाणी घ्या आणि त्यामध्ये १ चमचा मेथी दाणे घाला.
हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये १ चमचा मिरे घाला.
त्यासोबतच त्या पाण्यात १ चमचा रोजमेरी घाला. रोजमेरी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकते. आता हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा आणि ८ ते १० मिनिटे उकळू द्या.
त्यानंतर हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दररोज सकाळी केसांच्या मुळांवर शिंपडा. एकदा तयार केलेलं पाणी तुम्ही ३ दिवस वापरू शकता. त्यानंतर नविन पाणी तयार करा.
हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केसांच्या बऱ्याच तक्रारी कमी होऊ शकतात, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.