Home remedies: Curd facial for pimples, home hacks for glowing, radiant skin
चेहऱ्यावर आले खूप पिंपल्स? घरच्याघरी करा कर्ड फेशियल, दह्याची जादू- ग्लो येईल जबरदस्त!Published:February 7, 2022 03:55 PM2022-02-07T15:55:09+5:302022-02-07T16:06:27+5:30Join usJoin usNext १. धूळ, प्रदुषण, खाण्यापिण्यात झालेले बदल किंवा हार्मोनल चेंजेच यामुळे कधी कधी चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात.. २. वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरूनही पिंपल्स जात नाहीत. कधी कधी तर हे इन्फेक्शन एवढं वाढतं की हळूहळू सगळ्याच चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. ३. त्यासाठीच घरच्या घरी हा एक सोपा उपाय करून बघा.. Curd Facial करण्यासाठी आपल्याला फक्त ४ गोष्टी लागणार आहेत.. दोन स्टेपमध्ये आपल्याला हे फेशियल करायचं आहे... ४. सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक चमचा दही आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. ५. ३ ते ४ मिनिटे हळूवार हाताने आणि गोलाकार पद्धतीने चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवून टाकण्याची गरज नाही. ओल्या कपड्याने किंवा वाईप्सने चेहरा फक्त पुसून घ्या. ६. यामुळे तुमचा चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसून लागेल. ७. आता ही दुसरी स्टेप तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स घालविण्यासाठी आहे. यासाठी आपल्याला एक चमचा दही, चिमुटभर हळद आणि एक चमचा नीम पावडर लागणार आहे. ८. हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर लेप सुकला की चेहरा धुवून घ्या. ९. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. १०. आठवड्यातून दोनदा हा उपाय नियमित केल्यास पिंपल्सचा त्रास तर कमी होतोच, शिवाय चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो. टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीBeauty TipsSkin Care Tips