Join us   

चेहऱ्यावर आले खूप पिंपल्स? घरच्याघरी करा कर्ड फेशियल, दह्याची जादू- ग्लो येईल जबरदस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 3:55 PM

1 / 10
१. धूळ, प्रदुषण, खाण्यापिण्यात झालेले बदल किंवा हार्मोनल चेंजेच यामुळे कधी कधी चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात..
2 / 10
२. वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरूनही पिंपल्स जात नाहीत. कधी कधी तर हे इन्फेक्शन एवढं वाढतं की हळूहळू सगळ्याच चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात.
3 / 10
३. त्यासाठीच घरच्या घरी हा एक सोपा उपाय करून बघा.. Curd Facial करण्यासाठी आपल्याला फक्त ४ गोष्टी लागणार आहेत.. दोन स्टेपमध्ये आपल्याला हे फेशियल करायचं आहे...
4 / 10
४. सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक चमचा दही आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
5 / 10
५. ३ ते ४ मिनिटे हळूवार हाताने आणि गोलाकार पद्धतीने चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवून टाकण्याची गरज नाही. ओल्या कपड्याने किंवा वाईप्सने चेहरा फक्त पुसून घ्या.
6 / 10
६. यामुळे तुमचा चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसून लागेल.
7 / 10
७. आता ही दुसरी स्टेप तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स घालविण्यासाठी आहे. यासाठी आपल्याला एक चमचा दही, चिमुटभर हळद आणि एक चमचा नीम पावडर लागणार आहे.
8 / 10
८. हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर लेप सुकला की चेहरा धुवून घ्या.
9 / 10
९. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा.
10 / 10
१०. आठवड्यातून दोनदा हा उपाय नियमित केल्यास पिंपल्सचा त्रास तर कमी होतोच, शिवाय चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी