थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

Published:November 14, 2022 01:46 PM2022-11-14T13:46:23+5:302022-11-14T13:49:54+5:30

Home Remedies for Dry Hair : थंडीच्या दिवसांत केस खूप कोरडे होऊ नयेत यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतील याविषयी...

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

थंडीच्या दिवसांत केस खूप कोरडे होतात. एरवीही प्रदूषणामुळे तर कधी बाजारातील केमिकलयुक्त उत्पादने वापरल्याने केसांचा पोत बिघडतो. मात्र केस छान सिल्की असतील तर आपल्या सौंदर्यात भर पडते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत केस खूप कोरडे होऊ नयेत यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतील ते पाहुया (Home Remedies for Dry Hair)...

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

केसांचे चांगले पोषण होण्यासाठी केसांना आठवड्यातून दोन वेळा ऑईल मसाज करणे अतिशय आवश्यक असते. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल असे आपल्या केसांना सूट होणारे कोणतेही हेअर ऑईल तुम्ही लावू शकता.

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

बरेचदा केस धुतले की आपण ते टॉवेलने पुसतो. मात्र टॉवेलचे कापड हे केसांसाठी काही प्रमाणात रखरखीत असते. त्यामुळे केस पुसण्यासाठी टॉवेल वापरण्यापेक्षा एखादा होजिअरीचा टिशर्ट वापरला तरी चालतो. त्यामुळे केस कोरडे होण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो.

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

केसांसाठी वापरली जाणारी उत्पादनांमध्ये अनेकदा जास्त प्रमाणात रासायनिक पदार्थांचा समावेश केलेला असू शकतो. त्यामुळे केसांतील आर्द्रता कमी होऊन ते खूप ड्राय होतात. त्यामुळे कोणतीही उत्पादने वापरताना त्यातील रासायनिक पदार्थांविषयी योग्य ती माहिती घेऊन मगच ती उत्पादने वापरायला हवीत.

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

थंडीत किंवा एरवीही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुणे काहीसे अवघड वाटत असले तरी केस चांगले राहण्यासाठी ते आवश्यक असते. आपण अनेकदा आंघोळ करतानाच केस धुवत असल्याने अंगावर ज्याप्रमाणे गरम पाणी घेतो, त्याचप्रमाणे केसांवरही गरम पाणी घेतो. पण गरम पाण्यामुळे केस धुतल्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस आहेत त्याहून जास्त कोरडे होतात.

थंडीमुळे केस खूप ड्राय झालेत? सिल्की केसांसाठी घरीच करा ५ उपाय, केस होतील मस्त-मुलायम

घरच्या घरी काही हेअर मास्क करुन लावले तरीही केसांचा पोत सुधारण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्पा आणि काही ना काही ट्रीटमेंट घेण्यापेक्षा नियमितपणे या काही गोष्टींची काळजी घेतल्यास केसांचा पोत सुधारण्यास त्याची नक्कीच मदत होते.