उन्हाळा सुरू झाल्या-झाल्या ओठ कोरडे पडले ? त्वचा चाऊन खाऊ नका हे उपाय पाहा
Updated:March 9, 2025 19:21 IST2025-03-09T19:13:07+5:302025-03-09T19:21:05+5:30
Home Remedies For Dry Lips, Try This You Will Feel Better : उन्हाळ्यात ओठांना कोरड पडते. त्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे उपाय.

एकदा का मार्च सुरू झाला की, सारखं पाणी पित राहावं असंच वाटतं. चेहरा तर कोरडा पडतोच घसा सारखा खवखवतो. कोरडा पडतो. ओठांचीही हालत वाईट होते.
ओठ फुटतात. पांढरी त्वचा सारखी निघत राहते. मग नकळतच सारखी जीभ फिरवली जाते. दातांनी वर आलेली त्वचा चावली जाते. त्यामुळे ती त्वचा आणखी निघते. मग त्यातून रक्त येतं.
आई- आज्जी वर्षानुवर्षे करत आलेल्या काही सोप्या उपायांचा वापर करून फुटलेले ओठ पुन्हा छान मऊ करता येतात.
ओठांसाठी आजकाल अनेक प्रॉडक्ट बाजारात मिळतात. त्यांनी आयुर्वेदिक असल्याचा दावा केला तरी ते खरंच असतं याची खात्री नाही. त्यामुळे सांभाळूनच वापरायचे.
लिपबाम विकत घेताना विचारपूर्वक घ्या. स्वस्त मिळाला म्हणून घेतला असे करू नका. चांगल्या कंपनीचा लिपबाम वापरा.
रात्री झोपताना ओठांना गायीचे शुद्ध तूप लावा. तुमचे ओठ कितीही सुखले असले तरीही तुपाने चांगले होतातच.
साधे घरातील खोबरेल तेल ओठांना चोळून-चोळून लावायचे. तेलामुळे सुखलेल्या त्वचेला ओलावा मिळतो. कोरडही निघून जाते.
अति तिखट पदार्थ खायचे नाहीत. त्वचा फुटली असल्यावर ते खाताना ओठाला झोंबतात त्यामुळेही ओठ फुटतात.
ओठांवरून गुलाब पाण्याचा कापूस फिरवायचा. कोरडी पडलेली त्वचा पुन्हा चांगली होते.