आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा 'हा' खास बर्फ, टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल मस्त सोनेरी ग्लो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 9:04 AM 1 / 7पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप करायला वेळ नसेल तर हा एकदम सोपा उपाय करा..2 / 7हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरात अगदी सहज मिळणाऱ्या काही पदार्थांचा वापर करायचा आहे.3 / 7त्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे तांदळाचं पीठ घ्या.4 / 7त्यामध्ये २ टीस्पून मध टाका. 5 / 7त्या मिश्रणात आता एखाद्या बटाट्याचा रस करून टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आईस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ तयार करा.6 / 7या बर्फाने आठवड्यातून एकदा चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन त्वचेवर छानसा ग्लो येईल. 7 / 7तसेच कमी वयात येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाणही खूप कमी होईल... आणखी वाचा Subscribe to Notifications