चमकदार त्वचेचं ब्यूटी सिक्रेट- तांदळाच्या पाण्यात ३ पदार्थ टाकून चेहऱ्याला लावा, चेहरा चमकेल-पिगमेंटेशन होईल कमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 12:26 PM 1 / 6धूळ, प्रदुषण, ऊन यामुळे तसेच त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्याने त्वचेचा पोत खराब होत जातो. 2 / 6त्यामुळे त्वचा तर ड्राय- डल होतेच, पण त्वचेवर खूप पिगमेंटेशनही दिसू लागतं. म्हणूनच आता हा त्रास कमी करून चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय smakeup_tips43 या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे. 3 / 6हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पाणी आणि इतर ३ पदार्थ वापरायचे आहेत. सगळ्यात आधी तर २ टेबलस्पून तांदूळ एका वाटीत घ्या आणि २ वेळा पाणी बदलून ते स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी घाला आणि ३ ते ४ तास ती वाटी झाकून ठेवा.4 / 6४ तासांनी पाणी गाळून घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून रोज वाॅटर टाका.5 / 6रोज वाॅटर टाकल्यानंतर १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही १५ दिवस वापरून शकता. 6 / 6रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हे पाणी चेहऱ्यावर मारा. रात्रभर तुमच्या त्वचेला छान पोषण मिळेल आणि आठवडाभरातच त्वचेवर खूप छान फरक दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications