टॅनिंग घालविण्याचा एकदम सोपा उपाय- फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ- चमकदार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 2:06 PM 1 / 9हिवाळ्यातल्या कोरड्या- थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. 2 / 9अशावेळी वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच हा एक घरगुती उपाय पाहून घ्या. 3 / 9चेहरा, मान काळी पडली असेल तर त्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ praveenkkitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 9हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या.5 / 9या मिश्रणात आता १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घाला.6 / 9चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं हलवलं की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल.7 / 9 ही पेस्ट आता चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या.8 / 9त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा. 9 / 9यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ, नितळ, चमकदार दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications