उन्हामुळे सनबर्नचा त्रास? करा 'हा' जादुई उपाय, त्वचेला मिळेल थंडावा- टॅनिंग जाऊन उजळेल त्वचा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 9:19 AM 1 / 6उन्हाचा पारा सध्या खूपच वाढला आहे. त्यामुळे ज्यांना कामानिमित्त भर उन्हात घराबाहेर पडावेच लागते त्यांना टॅनिंग, सनबर्न असा त्रास होतो. (home remedies for sunburn and tanning due to hot summer)2 / 6तुम्ही कितीही अंगभर कपडे घातले तरीही उष्णतेमुळे, सुर्याच्या प्रखर किरणांमुळे अनेकांना त्वचेवर रॅश येण्याचा त्रास होत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आणि त्वचेला छान नैसर्गिक पद्धतीने थंडावा मिळण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.3 / 6उन्हामुळे होणारं टॅनिंग, सनबर्न हा त्रास कमी करायचा असेल तर कोरफड अतिशय गुणकारी ठरते (how to use aloevera for sunburn). कोरफडीचा त्यासाठी कसा वापर करायचा, याविषयीचा व्हिडिओ urmilanimbalkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 6त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सनबर्न झालं आहे, किंवा उन्हामुळे, उष्णतेमुळे अंगावर रॅश आली आहे, त्याठिकाणी कोरफडीचा ताजा गर काढून लावा.5 / 6चेहऱ्यावर टॅनिंग झालं असेल तर तिथेही कोरफडीचा ताजा गर चोळून लावा. तो गर बऱ्यापैकी वाळेपर्यंत अंगावर तसाच ठेवा. त्यानंतर तो स्वच्छ धुवून टाका.6 / 6अंगाला लावलेला कोरफडीचा गर धुवून टाकल्यानंतर त्वचेला छान मॉईश्चराईज करा. यामुळे सनबर्नमुळे अंगाची होणारी जळजळ कमी होईल. तसेच टॅनिंग निघून जाऊन त्वचाही छान उजळल्यासारखी दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications