Join us   

पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा झाला? ४ टिप्स, केस गळती थांबेल, स्काल्पमधील कोंडा-पुळ्या दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 8:34 AM

1 / 7
बदलत्या ऋतूत त्वचा आणि केसांमध्ये बदल दिसायला सुरूवात होते. एकदा केस गळण्याची समस्या सुरू झाली की महिनोंमहिने केस गळतात. केस गळण्यामागे केसात कोंडा तयार होणं हे कारण असू शकतं.
2 / 7
केसांमध्ये कोंडा तयार झाला की खाज येते स्काल्पवर एक पांढरा थर तयार होतो ज्यामुळे पूर्ण केस डॅमेज होतात. केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.
3 / 7
आपले केस खराब होतात, कोंडा होतो. तेव्हा आपण विकतच्या उत्पादनांचा वापर करतो. पण तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून कोंड्याची समस्याही दूर करू शकता. यासाठी खोबरेल तेल लिंबाचा सर्वाधिक वापर केला जातो. खोबरेल तेलानं केसांची मसाज करून मग केस धुवा.
4 / 7
केसांमधला कोंडा काढून टाकण्यासाठी तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरला पाहिजे. यामध्ये सेलेनियम सल्फाइड आणि केटोकोनाझोल सारखे घटक असतात जे टाळूवर उपस्थित फ्लेक्स काढून टाकतात आणि खाज येण्याच्या समस्येपासून देखील आराम देतात.
5 / 7
आठवड्यातून एकदा हा शॅम्पू वापरून पाहा. यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या पुन्हा उद्भवणार नाही. असे शॅम्पू तुम्हाला बाजारात आणि ऑनलाइन सहज मिळतील.
6 / 7
वेळेअभावी आपण आपल्या केसांची विशेष काळजी घेत नाही. त्यामुळे केस कोरडे होतात. अशा स्थितीत केसांमध्ये कोंडा वाढतो. अशा स्थितीत केसांना मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केसांमध्‍ये उपस्थित कोंडा दूर होईल, तसेच स्‍काल्‍प मजबूत होईल.
7 / 7
४) केस धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. त्यामुळे केस खडबडीत आणि कोरडे होतात, त्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊ लागतो. म्हणूनच तुम्ही तुमचे केस फक्त साध्या पाण्याने धुवा.
टॅग्स : केसांची काळजीब्यूटी टिप्सपावसाळा आणि पावसाळी आजारपण