संत्री खाऊन साल फेकू नका, त्वचेसाठी ‘असा’ करा उपयोग, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2024 9:15 AM 1 / 8संत्री आरोग्यासाठी जशी उत्तम असते, तसेच संत्रीचे सालदेखील त्वचेसाठी खूप उत्तम टॉनिक ठरते2 / 8केसांसाठी जी शिकेकाई करण्यात येते, त्यात संत्रीची सालं आवर्जून टाकली जातात. आता त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी संत्रीची सालं कशी वापरायची ते पाहूया...3 / 8संत्रीची सालं वापरून त्वचेसाठी नाईट ऑईल कसं तयार करायचं याची माहिती lifewithrose0 या पेजवर शेअर करण्यात आली आहे.4 / 8सगळ्यात आधी तर संत्रीची सालं काढून ती ४ ते ५ तासांसाठी वाळवून घ्या. त्यानंतर ती मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.5 / 8संत्रीच्या पावडरमध्ये आता ३ ते ४ लवंग आणि ती सगळी पावडर भिजेल एवढं ऑलिव्ह ऑईल टाका.6 / 8हे मिश्रण एका भांड्यात टाकून उकळून घ्या. थंड झालं की गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा.7 / 8रोज रात्री झोपण्यापुर्वी या तेलाचे ४ ते ५ थेंब घ्या आणि चेहऱ्याला मसाज करा...8 / 8काही दिवसांतच त्वचा अगदी तरुण दिसेल. डार्क सर्कल्स कमी होतील आणि त्वचेवर छान ग्लो येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications