केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

Published:February 19, 2022 04:50 PM2022-02-19T16:50:55+5:302022-02-19T16:58:06+5:30

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

१. तुमच्या स्वयंपाक घरात असणारा हा एक गोड पदार्थ केसांमधील कोंडा, केसांचा चिकटपणा, केसगळती या सगळ्या समस्यांवर अतिशय प्रभावी ठरू शकतो.. फक्त त्याचा योग्य वापर कसा करायचा, याचं तंज्ञ आपल्याला माहिती पाहिजे..

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

२. तोच पदार्थ चेहऱ्यावरचे पिंपल्स, मुरूमांचे डाग, वांगाचे डाग घालविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. एवढंच नाही तर उन्हामुळे झालेलं त्वचेचं टॅनिंग दूर करून काळवंडलेली त्वचा नितळ, स्वच्छ करण्यासाठीही मधाचा खूप उपयोग होतो..

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

३. हा पदार्थ आहे मध. मध जसा आरोग्यासाठी पोषक आहे, तसाच तो सौंदर्य खुलविण्यासाठीही उपयुक्त आहे.. फक्त आपल्याला मधाचा योग्य वापर कसा करायचा आणि त्याचा इफेक्ट आणखी वाढविण्यासाठी त्याला दुसऱ्या कोणत्या पदार्थाची जोड द्यायला हवी, हे समजून घ्यावं लागेल.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

४. त्वचेचं टॅनिंग (tanning) झालं असेल तर मधाचा अशा पद्धतीने वापर करून बघा. १ टी स्पून मध आणि २ टी स्पून टोमॅटोचा रस एकत्र करा. हा लेप चेहऱ्यावर लावून त्याने २ मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. सलग २- ३ दिवस हा उपाय केल्यास त्वचेचं टॅनिंग कमी होतं.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

५. त्वचेवर मुरुमांचे डाग (pimples and acne) असतील तर मध आणि रोझ वॉटरचं मिश्रण यावर उत्तम उपाय आहे. यासाठी १ टीस्पून मध आणि २ टीस्पून रोझ वॉटर एकत्र करून घ्या. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेवरील मुरुमांचे डाग हळूहळू कमी होतील आणि त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होईल.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

६. केस चिकट (freezy hair) झाले असतील तर हा उपाय करून बघा. यामुळे केस सिल्की आणि चमकदार (silky and shiny hair) होतील. यासाठी दोन टीस्पून मध एक ग्लास कोमट पाण्यात टाका. हे पाणी केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्यातासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

७. सनबर्नचा (sunburn) त्रास झाला असेल तर दोन टी स्पून मध आणि ४ टी स्पून कोरफडीचा गर एकत्र करा. हे मिश्रण सनबर्न झालेल्या त्वचेवर लावा. ३० मिनिटांनी धुवून टाका. यामुळे काळेपणा कमी हाेण्यास मदत होते.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

८. ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सची (black and white heads) समस्या कमी करण्यासाठीही मध उपयुक्त ठरतो. यासाठी २ टीस्पून मध एक टीस्पून गव्हाच्या पिठात कालवा. हे मिश्रण ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स असणाऱ्या जागेवर चोळा. यामुळे ब्लॅडहेड्स, व्हाईट हेड्स निघून जाऊन त्वचा स्वच्छ होईल.

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

९. डेडस्किन काढून टाकून त्वचा नितळ, स्वच्छ करण्यासाठी २ टीस्पून मध आणि २ टिस्पून साखर एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर चोळा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. नॅचरल स्क्रब (honey sugar scrub) म्हणून हा एक उत्तम लेप आहे.