1 / 8व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्याची, त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. आपल्या बिघडत्या जीवनशैलीचा आपल्या केसांवर सर्वाधिक परिणाम होतो. (Ayurvedic treatment for hair fall)2 / 8केस गळणे, केसांना फाटे फुटणे, कोरडेपणा आणि केसांची वाढ न होणे यांसारख्या समस्या होतात. परंतु, केसांची काळजी घेण्यासाठी आपण काही केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे त्यांचे नुकसान अधिक होते. (Natural remedies for hair loss)3 / 8स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर केल्यास केसगळतीच्या आणि केसांच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल. 4 / 8केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस फायदेशीर आहे. यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. जे केसांच्या कूपांना सक्रिय करण्यास, रक्ताभिसरण वाढविण्यास आणि केसांच्या वाढीला गती देण्याचे काम करते. 5 / 8केसांची वाढ होण्यासाठी नारळाचे तेल नैसर्गिक उपचार म्हणून काम करते. यामध्ये फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे, अँटी- ऑक्सिडंट्स आणि पौष्टिक मोलॅसिस असतात. जे आपल्या टाळू आणि केसांना निरोगी बनवतात. म्हणून रोज केसांना नारळाचे तेल लावायला हवे. 6 / 8केसांच्या मजबुतीसाठी कोरफडचा गर फायदेशीर असतो. त्वचेपासून ते केसांच्या वाढीसाठी हा उपयुक्त आहे. यात असणारे एंजाइम केसांच्या वाढीला चालना देतात. डोक्यातील कोंडा कमी करतात आणि टाळूला हायड्रेट ठेवतात. 7 / 8मेथीचे दाणे हे केसांसाठी चांगले टॉनिक मानले जाते. यामध्ये लोह आणि निकोटिनिक आम्ल भरपूर प्रमाणात असते.ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. 8 / 8ऑलिव्ह ऑइलमध्ये ओलेइक अॅसिड असते, जे केसांना मऊ आणि चमकदार बनवते. यामुळे केसांना पोषक तत्वे मिळतात. तसेच केस मजबूत होऊन केसगळती थांबते.