BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

Published:September 29, 2023 07:47 PM2023-09-29T19:47:42+5:302023-09-29T20:04:38+5:30

How to Apply BB Cream Like a Pro in Just 8 Steps : बी बी क्रिम (BB Cream) वापरून रोजच्या घाई गडबडीत मेकअप कसा करावा यासाठी काही सोप्या टिप्स...

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

१. बी - बी क्रिमचे पुर्ण नाव ब्लेमिश बाम (Blemish Balm) आहे. यालाच काहीजण ब्युटी बाम (Beauty Balm) असेही म्हणतात. चेहर्‍यावर ऊन किंवा पिंपल्समुळे जे काळे डाग पडतात त्याला 'ब्लेमिश' असे म्हणतात. हे काळे डाग लपवण्यासाठी प्रॉडक्ट ब्लेमिश बाम किंवा बी - बी क्रिम्स वापरतात. बी - बी क्रिम एक असे मेकअप प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये स्किन केअर करण्याचे गुणधर्म असतात. हे स्किनला पोषण देण्यासोबत स्किनमधील ओलावा टिकवून ठेवायला मदत करतात. याचबरोबर सुरकुत्यांपासून बचाव करण्यासठी सनस्क्रीनसारखे एसपीएफ प्रोटेक्शन देखील देते(How to Apply BB Cream: A Simple Guide to Using BB Cream).

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

२. जर आपल्या स्किनवर जास्त पिंपल्स येत असतील तर बी - बी क्रिम अतिशय फायदेशीर ठरु शकते. बी - बी क्रिममध्ये असणारे मिनरल्स फॉर्म्युला आपल्या चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तसे लपवण्यासाठी मदत करते. बी - बी क्रिम स्किनवर कोणताही लेयर बनवत नाही. पण हे काळ्या डागांचे रंग लपवून आजुबाजूच्या स्किनचा रंग मॅच करायला मदत करते.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

३. आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये बी - बी क्रिमचा वापर करु शकता. यामुळे आपल्याला मेकअप सारखा लूक मिळेल.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

४. बी - बी क्रिम खरेदी करताना आपल्या स्किन टोननुसार बी - बी क्रिम खरेदी करा. बी - बी क्रिमची शेड स्किन टोनशी मॅच झाली पाहिजे.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

५. साधरणतः आपण चेहरा धुवून मॉइश्चरायझर, सनस्क्रीन व फाउंडेशनचा बेस लावतो. यानंतर आपण अँटी एजिंग किंवा कंन्सिलरचा वापर करतो. परंतु वेळेच्या अभावी प्रत्येकवेळी हे डेली रुटीन फॉलो करायला वेळ नसतो. तेव्हा या सगळ्या क्रिम्सचे काम एकटी बी - बी क्रिम करते.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

६. चेहरा स्वच्छ धुवून थोडी क्रिम बोटांवर घ्या. चेहरा व मानेवर क्रिम्सचे डॉट लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहेऱ्यावर पसरवा. गरज वाटल्यास आपण दिवसातून २ वेळा ही क्रिम लावू शकता.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

७. जर आपली त्वचा कोरडी असेल तर बी - बी क्रिम लावण्याआधी सिरम किंवा मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे बी - बी क्रिम चेहऱ्यावर व्यवस्थित पसरण्यास मदत होईल. यामुळे आपल्याला क्लासी लूक मिळू शकतो.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

८. बी - बी क्रिम लावल्यानंतर अनेक लोशन्स किंवा क्रिम्स लावण्याची गरज भासत नाही.