Join us   

कॅस्टर ऑईल केसांना कसं लावावं? बघा खास पद्धत- केसांच्या सगळ्या समस्यांवर उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 4:40 PM

1 / 6
कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त असतं. त्यामध्ये ओमेगा ६ फॅटी ॲसिड असतं जे केसांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम आहे. (how to apply castor oil for hair)
2 / 6
त्यामध्ये असणारे काही घटक स्काल्पला चांगल्या प्रकारे मॉईश्चराईज करून हायड्रेटेड ठेवतं. त्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी पडून कोंडा होण्याचं प्रमाण खूप कमी होतं.
3 / 6
आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेलाचा उपयोग सौंदर्य आणि आरोग्यासाठी केला जातो.
4 / 6
हे तेल खूप जास्त चिकट असतं. त्यामुळे हे तेल कधीही नुसतं तसंच घेऊन केसांना लावू नका. खोबरेल तेल किंवा कोणत्याही इसेंशियल ऑईलमध्ये टाकूनच ते केसांना लावावं. तसेच हे तेल १५ दिवसांतून दोन वेळा एवढ्याच प्रमाणात लावा. त्यापेक्षा अधिक नको.
5 / 6
केसांना लावण्यासाठी जे कॅस्टर ऑईल घ्याल ते कोल्डप्रेस असावं. त्यात खूप केमिकल्स नको.
6 / 6
या तेलाची बाटली उघडल्यानंतर ती ६ महिन्यांच्या आत संपवा. त्यानंतर या तेलातले नैसर्गिक गुणधर्म हळूहळू कमी होत जातात आणि तेल अधिक चिकट होत जातं.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी