Join us   

पावसाळ्यात काजळ पसरून डोळ्यांखालचा भाग काळवंडतो? २ टिप्स- काजळ पसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 12:45 PM

1 / 5
काजळ लावल्यावर आपल्या डोळ्यांचं आणि चेहऱ्याचं सौंदर्य छान खुलून येतं.
2 / 5
पण बऱ्याचदा असं होतं की कितीही महागडं स्मज प्रुफ काजळ लावलं तरी पुढच्या २ ते ३ तासांतच ते पसरतं आणि मग डोळ्यांखालचा भाग काळवंडून चेहराच विचित्र दिसू लागतं. विशेषत: पावसाळ्यात तर हा त्रास जरा जास्तच जाणवतो. (how to apply kajal without smudging?)
3 / 5
म्हणूनच असं होऊ नये आणि ७ ते ८ तास तरी काजळ डोळ्यांवर जशास तसं राहावं, अजिबात पसरू नये, यासाठी काय उपाय करायचा याविषयीची माहिती reenaz_world या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (2 tips to make your simple kajal smudge proof)
4 / 5
यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे काजळ लावल्यानंतर त्यावरून लिक्विड आयलायनर फिरवा. आय लायनर वॉटरप्रुफ असावं. यामुळे काजळ अधिक छान उठून दिसेल आणि ते पसरणारही नाही.
5 / 5
दुसरा उपाय म्हणजे काजळ लावल्यानंतर एखादं काळं किंवा डार्क ब्राऊन, ग्रे रंगाचं आयशॅडो घ्या आणि ते एखाद्या टुथपिकवर किंवा एखाद्या आयशॅडो ब्रशवर घेऊन डोळ्यांना लावलेल्या काजळावर ठेवून नुसतं टॅप- टॅप करा... यामुळेही काजळ अजिबात पसरणार नाही.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्सडोळ्यांची निगाइन्स्टाग्राम