पाठ काळवंडल्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालणं नको वाटतं? ३ उपाय- पाठीवरचा मळ निघून जाईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 9:07 AM 1 / 5अंघोळ करताना आपण सगळ्या शरीराची स्वच्छता करतो. पण पाठीकडे मात्र दुर्लक्ष होते. कारण आपली आपणच पाठ स्वच्छ करायला थोडी कठीण जाते. (how to clean your back)2 / 5यामुळे मग शरीराच्या इतर भागापेक्षा मान आणि पाठ जरा जास्तच काळी दिसू लागते. काही जणींची पाठ तर एवढी काळवंडून जाते किंवा टॅन होते की त्यामुळे मग त्यांना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायलाही नको वाटते. (best trick to clean your back)3 / 5तुमचंही असंच झालं असेल तर काठवंडलेली पाठ स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा... डाळीचं पीठ, हळद आणि कच्चं दूध याचा एक लेप तयार करा आणि तो पाठीला लावा. लेप १० ते १५ मिनिटांनी सुकत आला की मोठ्या हॅण्डलाच पाठ घासण्याचा ब्रश घ्या आणि लेप घासून काढा. यामुळे पाठीवरचा मळ निघून जाईल. (home remedies for scrubbing back)4 / 5असाच लेप तुम्ही मुलतानी माती आणि रोज वॉटर यांचाही तयार करू शकता. हा लेप पाठीला लावून ठेवा आणि तो थोडा सुकू द्या. त्यानंतर स्क्रबर घेऊन पाठ घासून काढा. यामुळे त्वचेखालच्या भागात रक्ताभिसरण चांगले होऊन पाठीची त्वचा मुलायम, चमकदार होईल.5 / 5पाठीवर कधीच टॅनिंग होऊ नये म्हणून अंघोळ झाल्यावर एक उपाय न चुकता करा. तो उपाय म्हणजे अंघोळीनंतर पाठ ओली असतानाच ती एखादा जाडसर टॉवेल घेऊन घासायची. यासाठी तुम्ही टॉवेलचे दोन्ही टोक दोन्ही हातात पकडून पाठ घासू शकता. किंवा मग टॉवेलचे एक टोक एका हाताने वर पकडायचे, दुसरे टोक दुसऱ्या हाताने खाली पकडायचे आणि टॉवेल वर- खाली ओढत पाठ घासायची. रोज अंघोळीनंतर ३० ते ४० सेकंदासाठी एवढं केलं तरी पाठ कधीच टॅन होणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications