Join us   

गळणाऱ्या केसांच्या समस्येनं हैराण? १ सोपा उपाय- केस वाढतील भराभर-केस गळणं कायमचं बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 3:35 PM

1 / 7
केस गळणं, केसांची अजिबात वाढ न हाेणं, केसांमध्ये काही जीव नसल्यासारखे ते एकदम रुक्ष- कोरडे दिसणं किंवा मग केसांमध्ये काही चमक नसणं, यापैकी केसांच्या बाबतीतली कोणतीही तक्रार असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून बघा..(How to control hair loss?)
2 / 7
हा उपाय केल्यामुळे केसांचं आरोग्य तर सुधारणार आहेच (best solution for hair fall), पण त्वचादेखील चमकदार होण्यास मदत होईल. सुरकुत्या तसेच चेहऱ्यावरचे पिगमेंटेशनही कमी होईल.
3 / 7
केसांच्या वाढीसाठी आता आपण घरच्याघरी बायोटिन पावडर कशी करायची ते पाहूया.. (How to make biotine powder at home?) यासाठी आपण अनेक पौष्टिक घटक वापरणार आहोत. त्यामुळे केस आणि त्वचा यासोबतच आरोग्याच्याही अनेक तक्रारी दूर होतील. (remedies for silky, shiny, long and strong hair)
4 / 7
बायोटिन पावडर तयार करण्यासाठी १० ते १२ बदाम, ५ ते ६ अक्रोड, २ टेबलस्पून जवस, २ टेबलस्पून टरबूज- खरबूज आणि सुर्यफुलाच्या बिया, ४ टेबलस्पून ओट्स असं साहित्य लागणार आहे. कारण या सर्व साहित्यामध्ये केसांसाठी पौष्टिक ठरणारे भरपूर घटक आहेत.
5 / 7
आता वरील सर्व साहित्य मंच आचेवर भाजून घ्या. त्यानंतर थंड झालं की त्याची मिक्सरमध्ये फिरवून पावडर करून घ्या.
6 / 7
ही अर्धा ते एक टेबलस्पून पावडर दिवसातून एकदा दुधासोबत, कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत घ्यावी.
7 / 7
काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास बघा तुमचे केस आणि त्वचा दोन्ही कसे छान चमकतील...
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीत्वचेची काळजीहोम रेमेडी