अपर लिप्स करण्यासाठी घरच्याघरी 'या' पद्धतीने तयार करा व्हॅक्स, फेशियल हेअर काढण्याचा सोपा उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 3:38 PM 1 / 7थ्रेडिंग केल्यानंतर बहुतांशजणी अपर लिप्स करतात. म्हणजेच वरच्या ओठांच्या वर किंवा नाकाच्या खालच्या भागात जे अतिरिक्त केस असतात ते काढून टाकतात.2 / 7कधी कधी आयब्रोजची ग्रोथ खूप झालेली नसते. किंवा इतर कोणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्ससाठी पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नसते. पण फक्त अपर लिप्स वाढलेले असतात. अशावेळी फक्त तेवढ्या कामासाठी पार्लरमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच अशा वेळी घरच्याघरी व्हॅक्स तयार करून अपर लिप्स कसे करावेत ते पाहा..(how to do upper lips at home?)3 / 7अपर लिप्स किंवा फेशियल हेअर काढून टाकण्यासाठी घरच्याघरी व्हॅक्स कसं तयार करायचं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ aanchalnavneetjain या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी सगळ्यात आधी पातेल्यात अर्धा कप पाणी गरम करायला ठेवा.(how to prepare wax at home for removing facial hair and upper lips?)4 / 7त्या पाण्यामध्ये ३ चमचे साखर टाका. त्यानंतर १ चमचा कॉफी पावडर टाका. 5 / 7हे मिश्रण व्यवस्थित हलवून गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाका.6 / 7गरम केल्यानंतर जेव्हा हे मिश्रण थोडं घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा आणि ते मिश्रण एका वाटीत काढा. त्या वाटीमध्ये १ चमचा गव्हाचं पीठ टाकून घट्ट पेस्ट तयार करा.7 / 7आता हाताला थोडं तेल लावा. तयार केलेल्या घरगुती व्हॅक्सचा एक छोटासा गोळा घ्या आणि तो चेहऱ्यावरचे जिथले केस काढायचे आहेत तिथे लावून वरच्या बाजूने ओढा. असं २ ते ३ वेळा केल्यावर केस निघून जातील. या पद्धतीने तुम्ही फेशियल हेअर घरच्याघरी काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications