Join us   

कमी वयातच केस खूप पांढरे झालेत? 3 सोपे उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर, दाट केस राहतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 3:41 PM

1 / 7
सध्याच्या काळात केवळ मध्यमवयीन लोकच नाही तर 25 ते 30 वयोगटातील तरुणही पांढर्‍या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. यामुळे त्यांना कधीकधी कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही घरी बसून काही सोपे उपाय करू शकता. घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. (How to Get Black Hair Back ) जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास येईल. (Hair Care Tips)
2 / 7
साधारणपणे, लहान वयात केस पांढरे होऊ लागतात तेव्हा केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर, प्रदूषण, खाण्यापिण्यातील अनियमितता, अनुवांशिकता ही कारणं असू शकतात. केस सतत तुटल्यानं टाळूवर कोरडेपणा येतो. कोरडेपणामुळे केस पांढरे होऊ लागतात. (Curry leaves onion juice tomato curd for premature white hair problem home remedies scalp treatment)
3 / 7
केसांच्या समस्या अनुवांशिक कारणांमुळेही उद्भवू शकतात, परंतु यामागचे मुख्य कारण म्हणजे आपले धावपळीचे जीवन आणि अयोग्य खाण्याच्या सवयी. पोषण आणि काळजीच्या अभावामुळे अनेकदा लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. केस पिकण्यामागे तणाव हे देखील एक कारण आहे.
4 / 7
तरुण गट त्यांचे करिअर आणि भविष्याबद्दल खूप काळजी करतो, हा तणाव त्यांच्या केसांचे नुकसान करतो. याशिवाय झोपेची दिनचर्या वारंवार बदलल्यानेही या समस्येला सामोरे जावे लागते. (How to Make Gray Hair Black Again)
5 / 7
कढीपत्ता काळ्या केसांसाठी फायदेशीर ठरतो. त्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करून केसांना लावा आणि अर्ध्या तासानं केस धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यानं पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
6 / 7
२) कांद्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावल्यास पांढरे केस पुन्हा काळे होतातच. केस गळतीपासूनही आराम मिळतो.
7 / 7
३) टोमॅटो आणि दही एकत्र मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या, पेस्ट तयार झाल्यावर त्यात निलगिरीचे तेल घालून केसांना मसाज करा. अर्ध्या तासानं केस स्वच्छ पाण्यानं धुवून टाका. हे घरगुती उपाय केस काळेभोर ठेवण्यास फायदेशीर ठरतील.
टॅग्स : केसांची काळजीहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स