Join us

महागडं फेशियल, बॉडी पॉलिशिंग करण्यापेक्षा 'हा' उपाय करा, काही मिनिटांतच मिळेल ब्रायडल ग्लो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2024 13:38 IST

1 / 8
आलिया भट, राधिका मर्चंट यांच्यासारखा सुंदर ब्रायडल ग्लो चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावरच पाहिजे असेल तर त्यासाठी हा एक घरगुती उपाय लगेचच करून पाहा.. (how to get bridal glow in few minutes at home?)
2 / 8
महागडं फेशियल किंवा बॉडी पॉलिशिंग केल्यानंतर चेहऱ्यावर जसा ग्लो येतो, तसाच ग्लाे या अवघ्या १० रुपयांच्या घरगुती उपायातून मिळेल. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा. हा उपाय dr.javeria.atif या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (home remedies for getting perfectly bright and young looking skin)
3 / 8
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये ४ टेबलस्पून कच्चं दूध घ्या आणि त्यामध्ये १ टेबलस्पून मसूर डाळ भिजत घाला.
4 / 8
एक- दोन तास मसूर डाळ दुधामध्ये भिजत ठेवल्यानंतर ती मिक्सरमधून चांगली वाटून घ्या.
5 / 8
यानंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये काढा आणि त्यात २ टीस्पून चंदन पावडर आणि १ टीस्पून हळद लावा.
6 / 8
आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि हा लेप चेहऱ्यासकट संपूर्ण अंगाला लावा..
7 / 8
यानंतर ३० मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून तो लेप अंगावरून काढून टाका आणि आंघोळ करा...
8 / 8
यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचेवर छानसा ग्लो येईल..
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी