Join us   

फेशियल केल्यानंतर ग्लो जास्त दिवस टिकवण्यासाठी ६ टिप्स; चेहरा दिसेल टवटवीत, फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 6:04 PM

1 / 7
त्वचा सुंदर, ग्लोईंग दिसण्यासाठी कोणत्याही सण, उत्सवाच्यावेळी तर काहीजण कोणतंही निमित्त नसताना रेग्यूलर क्लिनअप, फेशियल करतात. चेहऱ्यावरच्या मृतपेशी निघून जाण्यासाठी फेशिअल केले जाते. फेशियल केल्यानंतर ३ ते ५ दिवसांनी त्वचेवर ग्लो येतो. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं पुन्हा चेहरा आधी होता तसा खराब होतो. चेहरा सुंदर, ग्लोईंग दिसण्यासाठी फेशियल केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Steps to Maintaining Your Post-Facial Glow)
2 / 7
१) फेशियल केल्यानंतर तुमची त्वचा खूप संवेदनशील होते. म्हणूनच त्वचा आतून हायड्रेट करणे खूप महत्वाचे आहे. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी, आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. फेशियल केल्यानंतर तुमच्या त्वचेवर चमक कायम राहावी, यासाठी तुम्ही रोज ८ ते १० ग्लास पाणी प्या.
3 / 7
२) फेशियल केल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका. कमीत कमी ५ ते ७ दिवस उन्हात जाणं टाळा. उन्हात जावं लागलं तरी सनस्क्रीन लोशनचा वापर करा.
4 / 7
३) फेशियल केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. तसेच चेहऱ्यावर गरम पाणी लावू देऊ नका. हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. फेशियल केल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा फक्त सामान्य पाण्याने धुवा.
5 / 7
४) फेशियलनंतर वॅक्सिंग देखील टाळावे. जर तुम्ही फेशियल केल्यानंतर वॅक्स केले तर ते तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. याशिवाय वॅक्स तुमच्या त्वचेची चमक काढून टाकू शकते. म्हणूनच फेशियल केल्यानंतर कधीही वॅक्स करू नये.
6 / 7
५) फेशियल केल्यानंतर स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक होते. यासाठी तुम्ही केवळ चेहराच स्वच्छ करू नये, तर तुमच्या वैयक्तिक वस्तूही स्वच्छ ठेवाव्यात. तुमचा टॉवेल, बेडशीट, उशी इ. बदला.
7 / 7
६) अनेकांना सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते, त्वचेवर डाग आणि पुरळ येऊ शकतात. विशेषतः, फेशियल केल्यानंतर, आपण आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे. जर तुम्ही क्रीम किंवा मॉइश्चरायझर देखील लावत असाल तर तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ करा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी