Join us   

How to Get Glowing Skin for Diwali : चेहरा डल, काळपट वाटतोय? घरीच 'हा' खास फेस पॅक वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 11:44 AM

1 / 6
सणासुदीला चेहरा ग्लोईंग दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं. रोजची दगदग, कामाचा व्याप यामुळे त्वचा थकल्यासारखी डल दिसते. पार्लरमध्ये पैसे घालवूनही हवातसा लूक मिळत नाही. त्वचेची हरवलेली चमक परत मिळवायची असेल. (How to get Glowing skin for diwali) त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीनं एलोवेरा फेस पॅक वापरून चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता. कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. (Benefits of aloe vera face pack knoe the deets)
2 / 6
कोरफडमध्ये म्यूकोपोलिसेकेराइड नावाचे संयुग असते, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
3 / 6
कोरफडमध्ये असलेले झिंक छिद्र घट्ट करण्यास मदत करते. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरूण राहू शकते.
4 / 6
तुम्ही एलोवेरा आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करू शकता. एका वाडग्यात एलोवेरा जेल आणि मुलतानी माती मिक्स करा. आता या मिश्रणात गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवा.
5 / 6
कोरफडीमध्ये मुरुमांविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुमांपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच, कोरफड अर्क आणि aloin (एक रासायनिक संयुग) त्वचा उजळ करण्यास मदत करतात असे मानले जाते.
6 / 6
रात्री चेहरा स्वच्छ धुवून एलोवेरा जेल लावल्यानं चेहरा ताजातवाना आणि फ्रेश दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी