Join us   

चेहऱ्यावरची चमक गेली- त्वचा डल दिसते? 'हा' उपाय करा- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2024 1:21 PM

1 / 7
आपल्या रोजच्या दगदगीमध्ये त्वचेकडे लक्ष द्यायला आपण विसरतो आणि त्याचा परिणाम मग हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो.
2 / 7
त्यातच आपल्या त्वचेला दररोजच धूळ, धूर, प्रदूषण, ऊन यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मग हळूहळू त्वचा निस्तेज होत जाते. त्वचेवरची चमक नाहीशी होते.
3 / 7
तुमच्याही त्वचेच्या बाबतीत असंच झालं असेल तर यापैकी कोणताही एक घरगुती उपाय करून बघा. त्वचेवर अगदी फेशियल केल्याप्रमाणे छान चमक येईल. (how to get instant glowing skin?)
4 / 7
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे २ चमचे बेसन पीठ आणि १ चमचा दही यांचं मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि त्वचेला मसाज करा. त्यानंतर लेप सुकला की चेहरा धुऊन टाका. त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा फ्रेश होईल. (simple home remedies for the glowing skin)
5 / 7
दूध आणि मध हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्वचेचं टॅनिंग कमी करण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे..(how to remove tanning and dead skin?)
6 / 7
त्वचेवरची चमक गेली असेल तर चंदनाची पावडर आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेसाठी हा उपाय खूप चांगला आहे.
7 / 7
२ चमचे पिकलेल्या केळीचा गर आणि १ चमचा मध हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवर छान चकाकी येईल आणि त्वचेला पोषण म्हणून ती छान मऊ- मुलायम होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी