1 / 8१. नव्यावर्षाची पार्टी किंवा छोटेखानी गेट- टुगेदर कुठे करायचं, याच तर प्लॅनिंग झालेलं असेलच. आता फक्त छान नटून- थटून तिथे जायचं एवढंच बाकी असेल..2 / 8२. पण तिथेच तर सगळी गडबड होते. पार्टीला जाण्याचं नियोजन खूप आधीपासून केलेलं असलं तरी नोकरी- घरातली कामं हे सगळं सांभाळताना उडायची ती धांदल उडतेच आणि मग ऐनवेळी स्वत:कडे लक्ष द्यायला, थोडा वेळ काढून निवांत मेकअप करायला जमतच नाही.3 / 8३. म्हणूनच न्यू इयर पार्टीसाठी किंवा एखाद्या दुसऱ्या पार्टीसाठी कमी वेळात झटपट तयार व्हायचं असेल तर या काही टिप्स पाहा आणि करून बघा.4 / 8४. पार्टीसाठी एखादा वेस्टर्न ड्रेसच हवा. त्यामुळे पार्टीवेअर गाऊन, वनपीस असे कपडे निवडा. असे कपडे नसतील तर एखादा स्लिव्हलेस स्टायलिश कुर्ता किंवा जीन्स- टॉप असे कपडेही चालतील. पार्टीसाठी कपडे निवडताना ते साधारण लाल, काळे किंवा डार्क निळ्या रंगाचे असावेत.5 / 8५. केसांचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. हेअरस्टाईल करायला फार वेळ नसेल आणि केसांना तेल नसेल तर ते सरळ मोकळे सोडा. केस धुवायला वेळ नसेल तर केसांचा एखादा हाय बन किंवा फ्रेंच रोल घाला. 6 / 8६. पार्टीला जायचंय म्हणजे ब्रेसलेट, गळ्यातलं किंवा कानातलं अशा ॲक्सेसरीज एकदम ट्रेण्डी असाव्यात. अशावेळी काही नाजूक- साजूक घालण्यापेक्षा बोल्ड लूक देणारं आणि चटकन लक्षात येतील, अशा वुडन, मेटल ज्वेलरी निवडाव्या.7 / 8७. लिपस्टिक आणि नेलपेंट हे थोडं डार्क रंगाचं आणि ग्लॉसी असलेलं पार्टीमध्ये कधीही उठून दिसतं. त्याचबरोबर चेहऱ्यावरचा मेकअपही मॅट फिनिशिंगऐवजी ग्लॉसी- शिमरी प्रकारातला असावा.8 / 8८. रात्रीच्या पार्टीसाठी काजळ आवर्जून घाला आणि डोळ्यांना शक्यता स्मोकी आय लूक द्या. एवढं केलं तरी पार्टीमध्ये तुम्ही नक्कीच हटके- स्टायलिश दिसू शकता. करून बघा.