Join us   

ब्लॅकहेट्समुळे चेहरा खडबडीत, डल दिसतोय? किचनमधले ६ पदार्थ लावा; चेहरा लगेच होईल क्लिन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 2:08 PM

1 / 8
चेहऱ्यावर डेड स्किन सेल्सच्या खाली ऑईल जमा झाल्यानं त्वचेवर छोट्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात ब्लॅकहेट्स आणि व्हाईटहेट्स येतात. हवेच्या संपर्कात आल्यानं ऑक्सिडाईज होणारी त्वचा काळी पडते. ब्लॅकहेट्स(Blackheads) घालवणं खूप कठीण असतं. काही घरगुती उपाय नाकावरचे ब्लॅकहेड्स सहज काढण्यास मदत करतील. (How to Get Rid of Blackheads on Nose )
2 / 8
पार्लरमध्ये जाऊन क्लिनअप किंवा फेशियल करताना ब्लॅकहेट्स कधी सहज निघतात तर कधी खूप वेदना जाणवतात आणि नाकही सुजतं. त्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास चेहऱ्याचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. (Blackheads on nose)
3 / 8
एक चमचा ग्रीन टी घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर 20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
4 / 8
ब्लॅकहेड्सवर केळीचे साल आतून चोळल्याने फायदा होतो. हे ब्लॅकहेड्स कमी करण्याचे काम करते.
5 / 8
अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ​​ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. गरजेनुसार हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि आणखी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग करा.
6 / 8
बटाटा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करू शकतो तसेच सुरकुत्या रोखू शकतो. यासाठी बटाट्याची साल काढून त्याचे काप ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा किंवा बटाट्याचा रस काढून लावा. यामुळे ब्लॅकहेड्स पूर्णपणे दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते.
7 / 8
लिंबू त्वचेसाठी खूप चांगला आहे. यामुळेच ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बनवलेल्या सर्व फेस पॅकमध्ये लिंबाचा रस मिसळला जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप चांगले आहे.
8 / 8
मध त्वचेला मॉइश्चरायझ करते. त्याच वेळी ते ब्लॅकहेड्स देखील दूर करते. ब्लॅकहेड्सवर मध लावल्यास त्वचाही स्वच्छ होते आणि ब्लॅकहेड्स निघून जातात.
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स